शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रद्दी विकून मोदी सरकारने करोडो कमावले; सरकारी १३ लाख ७३ हजार फायली निकाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 06:22 IST

महिनाभरात केंद्र सरकारच्या कार्यालायात ८ लाख चौरस फूट जागा रिकामी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार सरकारने प्रलंबित  प्रकरणे आणि सार्वजनिक तक्रारी वेळेत  आणि प्रभावीपणे निकालात काढण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली. 

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली :   केंद्र सरकारने २ ऑक्टोबरला हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमेंअंतर्गत केंद्र सरकारच्या  कार्यालयातून तब्बल १३ लाख ७३ हजार २०४ फायलींची विल्हेवाट लावून महिनाभरात केंद्र सरकारच्या कार्यालायात ८ लाख चौरस फूट जागा रिकामी करण्यात आली. एवढेच नव्हे, रद्दी आणि भंगार विकून ४० कोटी रुपयांची कमाईही केली.

या स्वच्छता मोहिमेच्या फलनिष्पत्तीचा प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाच्या (डीएपीजी) वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आढावा घेतला. या मोहिमेच्या फलिनष्पत्तीबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, एकूण १५ लाख २३ हजार ४६४ फायलींपैकी १३ लाख ७३ हजार २०४ फायली निकालात काढून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. त्यामुळे  एकूण ८ लाख चौरस फूट जागा रिकामी झाली आहे. 

८ लाख चौरस फूट जागा झाली रिकामीn    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार सरकारने प्रलंबित  प्रकरणे आणि सार्वजनिक तक्रारी वेळेत  आणि प्रभावीपणे निकालात काढण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली. n    सर्व कार्यालयांतील सार्वजनिक तक्रारी, संसद सदस्य, राज्य सरकार, आंतरमंत्रालय सल्ले आणि संसदीय आश्वासनांसंदर्भातील प्रकरणे वेळेत आणि प्रभावीपणे निकाली काढायच्या होत्या.n    जुन्या फायली निश्चित करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आल्या. पंतप्रधान मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियानांने प्रेरित होऊन ही प्रथा पुढेही चालू ठेवणार असल्याचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले. जेणेकरुन सर्व कार्यालये स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवता येतील.

n    विविध श्रेणीतील प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करण्यासाठी  सरकारने सर्व मंत्रालये, विभागांचे तुलनात्मक विश्लेषण करण्याचे आणि स्पर्धात्मक भावनेला चालना देण्यासाठी सामायिक सर्वोत्तम प्रथेचा अवलंब करावा, असे निर्देश डीएपीजीला दिले होते.n    प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने केंद्र सरकारची सर्व मंत्रालये, विभागातील जुन्या फायलींची (संचिका) विल्हेवाट लावण्यासाठी ही मोहीम २ ऑक्टोबरपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात आली.

n    जवळपास १३,७३,२०४ फायली निकालात काढण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे ३,२८,२३४ सार्वजनिक तक्रारींपैकी २,९१,६९२ तक्रारी ३० दिवसांत निकाली काढण्यात आल्या. n    खासदारांच्या संदर्भातील ११,०५७ पैकी ८,२८२ तक्रारींचा सोक्षमोक्ष लावण्यात आला. या मोहिमेत जुन्या फायली हटवून केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांत ८ लाख चौरस फूट जागा रिकामी करण्यात आली. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार