शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

मोदी सरकारने नोकरशाहीत केले मोठे बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 06:17 IST

दोन डझन अधिकाऱ्यांची पदोन्नती तसेच पदावनती; ब्रज राज शर्मा कर्मचारी निवड आयोगाचे अध्यक्ष

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : नरेंद्र मोदी प्रशासनाने नोकरशाहीत सचिव आणि सहसचिव पातळीवरील जवळपास दोन डझन अधिकाऱ्यांची पदोन्नती/पदावनती केली आहे. ब्रज राज शर्मा (आयएएस, १९८४, जम्मू-काश्मीर) यांना कर्मचारी निवड आयोगाचे अध्यक्ष केले आहे. ते सीमा व्यवस्थापन विभागाचे सचिव होते.

संजीव गुप्ता (आयएएस, १९८५, हिमाचल प्रदेश) यांना मूळ जागी म्हणजे गृह मंत्रालयात आंतरराज्य परिषदेचे सचिव म्हणून तर शैलेश यांंना डिपार्टमेंट आॅफ पब्लिक एंटरप्रायजेसचे सचिव म्हणून नियुक्त केले आहे. सध्या शैलेश हे अल्पसंख्याक मंत्रालयात सचिव आहेत.उत्तर प्रदेश केडरचे अलोक टंडन यांना प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक गाºहाणी विभागाचे सचिव नेमले आहे. ते त्यांच्या नव्या जबाबदारीसोबत पेन्शन्स आणि पेन्शनर्स कल्याण विभागाचा सचिवपदाचा अतिरिक्त कारभारही पाहतील. सध्या ते नोएडा अ‍ॅथॉरिटीचे अध्यक्ष आहेत.

संजीव नंदन सहाय (आयएएस, १९८६ केंद्रशासित) यांना त्यांच्या मूळ जागी, ऊर्जा मंत्रालयात सचिव नेमण्यात आले आहे.तेथून सुभाषचंद्र गर्ग (आयएएस, १९८३, राजस्थान) हे ३१ आॅक्टोबर रोजी निवृत्त होत आहेत. सहाय हे ऊर्जा मंत्रालयात विशेष सचिव म्हणून कार्यरत आहेत. प्रमोद कुमार दास (आयएएस, १९८६, मध्यप्रदेश) यांना अल्पसंख्य कामकाज मंत्रालयात सचिवपद दिले आहे. सध्या ते अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागात विशेष सचिव आहेत.

नागेंद्रनाथ सिन्हा (आएएस, १९८७, झारखंड) सध्या नितीन गडकरी यांच्या मंत्रालयांतर्गत एनएचएआयचे अध्यक्ष असून त्यांना सीमा व्यवस्थापन विभागात सचिवपदी नेमण्यात आले आहे. तुहीन कांता पांडेय यांना अनिल कुमार खाची यांच्या जागी गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या सचिवपदी नेमण्यात आले आहे.

खाची यांना त्यांच्या मूळ राज्यात हिमाचल प्रदेशला पाठवण्यात आले आहे. नागालँड केडरचे पंकज कुमार हे युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिवपदाच्या दर्जाचे व वेतनाचे असतील. ही पदोन्नती तात्पुरती आहे. सध्या ते इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयात अतिरिक्त सचिव आहेत.

राजेश भूषण यांना मंत्रिमंडळ सचिवालयात त्यांच्या मूळ जागी सचिव (समन्वय) नियुक्त केले गेले आहे. ट्रिफेडचे व्यवस्थापकीय संचालक प्रविर कृष्णा हे सचिवपदाचा दर्जा व वेतनाचे आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार