शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

केमिस्ट्रीसोबत म्युझिक, फिजिक्ससोबत फॅशन डिझायनिंग; शिक्षण क्षेत्रात भन्नाट ट्युनिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 20:19 IST

नव्या शैक्षणिक धोरणाला मोदी सरकारकडून मंजुरी; तब्बल ३४ वर्षानंतर देशात नवं शैक्षणिक धोरण

नवी दिल्ली: मोदी सरकारनं नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली आहे. तब्बल ३ दशकांनंतर शैक्षणिक धोरणांमध्ये आमूलाग्र बदल होत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. नव्या धोरणानुसार १०+२ ची जागा ५+३+३+४ घेईल. पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण देण्यावर भर दिला जाईल. याशिवाय एम. फीलची डिग्री बंद होईल. शालेय शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर भर देण्याचा प्रयत्न नव्या शैक्षणिक धोरणातून करण्यात येणार असल्याचं जावडेकर यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलं.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती जावडेकरांनी दिली. गेली ३४ वर्षे शैक्षणिक धोरणात बदल झाले नव्हते. त्यामुळे सरकारनं टीएसआर सुब्रमण्यम आणि डॉ. के. कस्तुरीरंगन अशा दोन समित्यांची स्थापना केली होती. शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिफारसी मागवण्यात आल्या होत्या, असं जावडेकरांनी सांगितलं. एका शाखेला प्रवेश घेतल्यावर विद्यार्थ्याला त्याचवेळी दुसऱ्या शाखेतील एखादा आवडता विषय शिकता येत नाही. सध्याच्या शैक्षणिक धोरणातील ही त्रुटी नव्या धोरणातून दूर करण्यात आली आहे. नव्या शैक्षणिक धोरणात फिजिक्स ऑनर्ससोबत केमिस्ट्री, गणित शिकता येईल. हे विषय शिकत असताना सध्या फॅशन डिझायनिंग शिकता येत नाही. मात्र नव्या शैक्षणिक धोरणात हे शक्य होईल. याशिवाय आर्थिक आणि अन्य कारणांमुळे अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शैक्षणिक प्रवाहात येण्याची संधी मिळेल.इंजिनीयरिंगचं शिक्षण अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांकडे सध्याच्या अवस्थेत कोणताही पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे या शिक्षणाचा विद्यार्थ्यांला थेट उपयोग होत नाही. यामुळे विद्यार्थी थेट व्यवस्थेच्या बाहेर जातो. मात्र नव्या व्यवस्थेत एक वर्षानंतर सर्टिफिकेट, दोन वर्षांनंतर डिप्लोमा आणि तीन किंवा चार वर्षानंतर डिग्री देण्यात येईल. त्यामुळे इंजिनीयरिंग पूर्ण करू न शकलेल्या विद्यार्थ्यांचं नुकसान टळेल.बोर्ड परीक्षांचं महत्त्व कमी होणार; पाचवीपर्यंत मातृभाषेतच शिक्षण मिळणार; नवं शैक्षणिक धोरण जाहीरशिक्षण क्षेत्रातील 10+2 पद्धत जाणार; 5+3+3+4 व्यवस्था येणार; जाणून घ्या नेमकं काय बदलणारआता घोकंपट्टीवर नव्हे, तर ज्ञानावर आधरित परीक्षा होणार; नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी