शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

५जी प्रक्रियेतून चीनच्या हुवेईची हकालपट्टी; भारताचा जोरदार दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 06:42 IST

चीनला धडा शिकवण्यासाठी केंद्र सरकारचं कठोर पाऊल

- हरीश गुप्तानवी दिल्ली: भारतात ५जी सेवा सुरू करण्याच्या प्रक्रियेतून चीनच्या हुवेई या दूरसंचार कंपनीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. लडाखमधील पूर्व भागात गलवान खोऱ्यामध्ये चिनी लष्कराबरोबर सोमवारी रात्री झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्या पार्श्वभूमीवर चीनला धडा शिकवण्यासाठी केंद्र सरकारनं हे कठोर पाऊल उचललं आहे.भारतात ५जी सेवा सुरू करण्याच्या प्रक्रियेत अगदी अखेरच्या क्षणी केंद्र सरकारनं हुवेई कंपनीलाही सहभागी करून घेतलं होतं. त्याबद्दल अमेरिकेनं २०१९ मध्ये भारतावर जोरदार टीकाही केली होती. देशातील सुरक्षा तज्ज्ञ व अन्य मंडळींनीही हुवेई कंपनीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले होते. ५ जीच्या तंत्रज्ञानाच्या भारतातील चाचण्यांमध्ये हुवेईचाही समावेश झाल्यानं अमेरिकेतील राज्यकर्ते व उद्योगजगत अस्वस्थ झाले होते.गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर केंद्रीय दूरसंचार खात्यानं तातडीनं एक बैठक घेतली. ५ जी तंत्रज्ञान भारतात आणण्यासंदर्भात डिसेंबर २०१९ मध्ये सुरू केलेली प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ५ जी तंत्रज्ञानाच्या कामातून हुवेई कंपनीला याआधी अमेरिका, जपान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या देशांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर इंग्लंडनं अगदी नाममात्र या कंपनीला सोपवलं आहे. कोरोना साथ रोखण्यासाठी योग्य पावलं न उचलल्याबद्दल चीनविरोधात भारतासह ६३ देशांनी कठोर भूमिका घेतली होती. आता हुवेई कंपनीलाही ५ जी तंत्रज्ञान प्रक्रियेतून भारतानं बाहेर काढल्यानं चीनची आणखी कोंडी झाली आहे. ४ जी सेवेसाठी लागणारी उपकरणं, सुटे भाग पुरवण्यास चिनी कंपन्यांना केंद्रीय दूरसंचार खात्यानं बुधवारी बंदी घातली होती. त्यानुसार सार्वजनिक क्षेत्रातील भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल), महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) या दूरसंचार कंपन्यांनी हुवेई व झेडटीई या चिनी कंपन्यांकडून उपकरणं विकत घेऊ नये असा आदेश केंद्रीय दूरसंचार खातं देणार आहे. त्यानंतर आता ५ जी तंत्रज्ञानाच्या प्रक्रियेतूनही चीनची हकालपट्टी करून भारतानं मोठा झटका दिला आहे.

तंत्रज्ञान येण्यास पुन्हा विलंब६० कोटींहून अधिकचे इंटरनेट वापरकर्ते भारतात आहेत. ही इंटरनेट सेवा अधिक जलद करण्यासाठी ५ जी तंत्रज्ञान आणण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. मात्र आता ही प्रक्रिया यंदाच्या वर्षाच्या अखेरपर्यंत किंवा २०२१ पर्यंत पुढे ढकलली जाणार आहे. हे तंत्रज्ञान भारतात येण्यास आधीच उशीर झाला होता, त्यात आता हा नवीन अडथळा उभा राहिला आहे. 

टॅग्स :huaweiहुआवेchinaचीन