शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

'मोदी सरकारने ठाना हैं, जनता को लूटते जाना हैं', राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 07:21 IST

Rahul Gandhi : पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किमतीवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

- शीलेश शर्मा

नवी दिल्ली : पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किमतीवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवर म्हटले की, “मोदी सरकार ने ठाना हैं, जनता को लूटते जाना हैं, बस ‘दो’ का विकास कराना हैं.”माकपचे नेते सीताराम येचुरी यांनी अर्थव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करून म्हटले की, “मोदी सरकारच्या अर्थव्यवस्थेत श्रीमंत अधिक श्रीमंत, तर गरीब जास्त गरीब होत आहेत, याचे पुरावे आहेत.” याच प्रकारे पेट्रोल व डिझेलच्या भावावरून केलेल्या ट्वीटमध्ये येचुरी यांनी आकडेवारीही दिली. त्यात म्हटले आहे की मे २०१४ मध्ये पेट्रोलचा आधार भाव ४७.१२ रुपये होता. केंद्राचा कर १०.३९ रुपये, डीलरचे कमिशन २ रुपये, राज्याचा कर ११.९ रुपये होता. तेव्हा पेट्रोल ७१.४१ रुपये लिटर विकले जायचे. फेब्रुवारी २०२१ मध्ये आधारभाव २९.३४ रुपये, केंद्राचा कर ३२.९८ रुपये, डीलरचे कमिशन ३.६९ रुपये, राज्याचा कर १९.९२ रुपये आणि पेट्रोलचा भाव ८६.३ रुपये झाला. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी मोदी सरकार पेट्रोल व डिझेलचे भाव वाढवून तिजोरी भरीत असल्याचा व हा पैसा कुठे खर्च केला जात आहे हे कोणालाच समजत नाही, असा आरोप केला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPetrolपेट्रोलNarendra Modiनरेंद्र मोदी