शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या 'शुभमंगल'बद्दल मोदी सरकार 'सावधान'; वयोमर्यादा २१ वर नेणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 20:19 IST

अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी दिले होते संकेत

नवी दिल्ली: मुलींच्या लग्नाचं वय २१ वर्षे करण्याचा निर्णय मोदी सरकारकडून घेतला जाऊ शकतो. हा निर्णय मोदी सरकारच्या विचाराधीन असल्याचं वृत्त इंग्रजी वृत्तपत्र 'इकॉनॉमिक टाईम्स'नं दिलं आहे. मातृत्व मृत्यूदर कमी करण्याच्या दृष्टीनं सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून मुलींचं लग्नाचं वय वाढवण्यात येऊ शकतं. मुलींचं आई होण्याचं योग्य वय नेमकं किती असावं, याबद्दलचा सल्ला देण्यासाठी एका कृती दलाची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्याच आठवड्यात अर्थसंकल्प सादर करताना दिली होती. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या एका निर्णयानंतर सरकारनं या हालचाली सुरू केल्या आहेत. सध्या मुलींचं लग्नाचं वय १८, तर मुलांचं लग्नाचं वय २१ वर्षे आहे. सर्वोच्च न्यायालयानं ऑक्टोबर २०१७ मध्ये दिलेल्या एका निकालामुळे मोदी सरकार मुलींच्या लग्नाचं वय वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं 'इकॉनॉमिक टाईम्स'नं म्हटलं आहे. वैवाहिक बलात्कारांपासून (मॅरिटियल रेप) मुलींचं रक्षण करण्यासाठी बाल विवाह पूर्णपणे अवैध मानले जावेत, असं न्यायालयानं निकाल देताना म्हटलं होतं. मुलींचं लग्नासाठीचं वय निश्चित करण्याचं काम सरकारचं असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं होतं. काय सांगते आकडेवारी?युनिसेफच्या आकडेवारीनुसार, भारतातल्या २७ टक्के मुलींचं लग्न त्यांची वयाची १८ वर्षे पूर्ण होण्याआधीच करण्यात येतं. तर ७ टक्के मुलींचे विवाह वयाच्या १५ वर्षांआधीच केले जातात. देशातल्या अनेक राज्यांमध्ये बालविवाहाची प्रथा आहे. बालविवाह रोखण्यासाठी कठोर कायदे आहेत. मात्र तरीही बऱ्याचदा अशा घटना समोर येत नाहीत. काय म्हणाल्या होत्या अर्थमंत्री?'आधी वयाच्या १५ व्या वर्षी मुलींचे विवाह व्हायचे. १९७८ मध्ये शारदा कायदा आणून त्यात बदल करण्यात आला. यानंतर मुलींच्या लग्नाचं वय १८ वर्षे करण्यात आलं. मुलींच्या शारीरिक पोषणाच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला. याच अनुषंगानं सरकारकडून एका कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्याकडून याबद्दलचा पुनर्विचार केला जाईल,' असं सीतारामन म्हणाल्या होत्या.

टॅग्स :marriageलग्नNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन