शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार करणार 'या' चार बँकांचं विलीनीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 20:00 IST

देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बँक तयार होणार

नवी दिल्ली: देशातील बँकांची स्थिती सुधारण्यासाठी मोदी सरकार 4 सरकारी बँकांचं विलीनीकरण करणार आहे. या विलीनीकरणातून देशात स्टेट बँक ऑफ इंडियानंतरची दुसरी मोठी बँक तयार होईल. सध्या देशातील सरकारी बँकांवर कोट्यवधी रुपयांचं कर्ज आहे. या बँकांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांचं विलीनीकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. काही महिन्यांपूर्वीच स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ हैदराबाद आणि भारतीय महिला बँकेचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण करण्यात आलं. यानंतर आता मोदी सरकारनं आयडीबीआय, सेंट्रल बँक, बँक ऑफ बडोदा आणि ओरिएंटल बँकेचं विलीनीकरण करण्याची तयारी सुरू केली आहे. या सर्व बँका एकत्र आल्यावर त्यांच्या संपत्तीचं एकूण मूल्य 16.58 लाख कोटी रुपये इतकं असेल. 2018 मध्ये या बँकांचा तोटा जवळपास 22 हजार कोटी रुपयांच्या घरात गेला आहे. त्यामुळे या बँकांचं विलीनीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे. बुडीत खात्यात गेलेल्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या बँकांना नवसंजीवनी देण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. सध्या या चारही बँकांना नुकसानाला सामोरं जावं लागतं आहे. विलीनीकरणानंतर या बँकांना त्यांच्याकडे असणारी संपत्ती सहज विकता येईल आणि त्यातून त्यांचं नुकसान भरुन काढता येईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर बँकिंगच्या नियमांमध्येही लवकरच मोठे बदल होणार आहेत. मोठ्या तोट्यात असणाऱ्या बँकांना या नियमांचा फटका बसणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं बँकांचा तोटा कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. बँकांचं विलीनीकरण हा त्याच प्रयत्नांचा भाग समजला जात आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीbankबँक