शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

...तर भारतीय बाजारातून 'चिनी कम' होणार; मोदी सरकार मोठा निर्णय घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 06:42 IST

चीनवरून भारतात होणाऱ्या आयातीचे प्रमाण १४ टक्के इतके आहे. यापुढे हे प्रमाण कमी करण्याचा विचार सुरू आहे.

नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या सीमेवर जसा तणाव वाढला आहे तसेच दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधही ताणले जाताना दिसत आहेत. चीनमधून येणाऱ्या अनेक वस्तूंवर भारताचे अर्थमंत्रालय सीमाशुल्क वाढवण्याच्या विचारात आहे. चीनवरून भारतात होणाऱ्या आयातीचे प्रमाण १४ टक्के इतके आहे. यापुढे हे प्रमाण कमी करण्याचा विचार सुरू आहे. याबाबत अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.सध्या देशात मोठ्या प्रमाणावर येणाºया चिनी अनावश्यक वस्तूंवरील कर लावण्याबाबत विचार सुरू आहे. भारतीय मोठ्या प्रमाणात चिनी बनावटीची मनगटी घड्याळे, भिंतीवरील घड्याळे, इलेक्ट्रानिक्स साहित्य, फर्निचर, खेळणी, वाद्ये, खेळांचे साहित्य, गाद्या, प्लॅस्टिकच्या वस्तू, लोखंडाच्या वस्तू आदींचा वापर दैनंदिन जीवनात वापरतात.कर वाढवताना सरकारचे याकडेही लक्ष असणार आहे की, या वस्तूंचे उत्पादन यापुढे मेक इन इंडिया मोहिमेंतर्गत भारतातच मोठ्या प्रमाणात केले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेपुढे आत्मनिर्भर भारताचा नारा दिला होता. यासोबत त्यांनी २० लाख कोटींचे पॅकेज देत भारतीयांना स्वावलंबी बनण्याचा आग्रह धरला होता. भारत-चीन सीमेवर लडाखमध्ये दोन्ही देशांमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लडाखमधील शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनीही मोदींच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता. वांगचुक यांनी चीनवर बहिष्कार टाकण्याबाबत पोस्ट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यानंतर कान्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) या संघटनेनेही चिनी उत्पादनांवर बहिष्कार घाला आणि भारतीय वस्तूंना प्राधान्य द्या, असे आवाहन केले होते. कॅटने बहिष्कार घालता येतील अशा ३ हजार चिनी उत्पादनांची यादीच जारी केलीहोती.

टॅग्स :chinaचीन