शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मंत्रिमंडळाची उद्या बैठक; होळीपूर्वी कर्मचाऱ्यांना सरकार देऊ शकतं मोठं गिफ्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 18:32 IST

Modi Government Cabinet Meeting : चार राज्यांमध्ये सरकार स्थापनेसाठी मंथन सुरू असतानाच केंद्रीय मंत्रिमंडळाची ही महत्त्वाची बैठक होणार आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाची Cabinet Meeting) बैठक उद्या दुपारी एक वाजता संसद भवनात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. मंत्रिमंडळाची ही बैठक कोणत्या अजेंड्यावर होणार, हे सध्या स्पष्ट झालेले नाही. या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. तसेच, चार राज्यांमध्ये सरकार स्थापनेसाठी मंथन सुरू असतानाच केंद्रीय मंत्रिमंडळाची ही महत्त्वाची बैठक होणार आहे.

बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय झाला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना होळीच्या पार्श्वभूमीवर मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. देशभरातील लाखो कर्मचारी वाढीव डीएच्या प्रतीक्षेत आहेत. तज्ज्ञांच्या मते, सरकार दरवर्षी मार्चमध्ये महागाई भत्ता जाहीर करते. यावेळी उद्या म्हणजेच 16 तारखेला होणाऱ्या या बैठकीत सरकार महागाई भत्त्याबाबत निर्णय घेऊ शकते, अशी अपेक्षा आहे.

जानेवारी 2022 पासून कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जाणार होता, मात्र सरकार आता महागाई भत्त्या वाढवण्याची घोषणा करू शकते, असे मानले जात आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या पगारासह नवीन महागाई भत्त्याची संपूर्ण रक्कम दिली जाईल. होळीनंतर कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यांचे सर्व पैसे मिळतील, असे म्हटले जात आहे. 

दरम्यान, याआधी महागाई भत्ता हा 31 टक्के देण्यात येत होता, आता तो 34 टक्के मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनामुळे गेल्या 18 महिन्यांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळाला नाही. त्यावर केंद्र सरकार आता वन टाईम सेटलमेंट करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात चांगलीच वाढ होणार आहे. 

किती रुपये मिळणार महागाई भत्ता? एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 18 हजार रुपये असेल तर त्याला 31 टक्के महागाई भत्त्यानुसार 5580 रुपये प्रति महिना महागाई भत्ता मिळू शकतो. जर महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवला आणि तो 34 टक्के केला तर त्या हिशोबाने महागाई भत्ता 6120 रुपये प्रति महिना इतका होईल. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीEmployeeकर्मचारी