शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये याआधी आलेली पूरस्थिती मोदींना महत्त्वाची वाटली नाही- लालू प्रसाद यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2017 15:13 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयावर राष्ट्रीय जनता दल (राजद) चे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी जोरदार टीका केली आहे. 

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयावर राष्ट्रीय जनता दल (राजद) चे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी जोरदार टीका केली आहे. 'यापूर्वीही बिहारमध्ये अनेकदा पूरस्थिती निर्माण झाली पण, त्यावेळी मोदींना ती महत्वाची वाटली नाही एखाद्या छोट्या होडीमधूनही त्यांनी कुठल्याही ठिकाणाला भेटही दिली नाही, अशी टीका लालू प्रसाद यादव यांनी केली आहे.

नवी दिल्ली, दि. 26- मुसळधार पावसामुळे बिहारमध्ये भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी या भागाची हवाई पाहणी केली. हवाई पाहणी केल्यानंतर पूर्णिया जिल्ह्यात वरिष्ठ अधिका-यांसोबत झालेल्या बैठकीत मोदींनी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी  बिहारला तात्काळ 500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयावर राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी जोरदार टीका केली आहे. 

'यापूर्वीही बिहारमध्ये अनेकदा पूरस्थिती निर्माण झाली पण, त्यावेळी मोदींना ती महत्वाची वाटली नाही. एखाद्या छोट्या होडीमधूनही त्यांनी कुठल्याही ठिकाणाला भेटही दिली नाही, अशी टीका लालू प्रसाद यादव यांनी केली आहे. बिहारमध्ये पूर आलेला नाही, तर आणला गेला आहे. नीतिशकुमार सरकारच्या इंजिनिअरने धरण फोडून हा पूर आणला आहे' असा घणाघाती आरोपही लालू प्रसाद यादव यांनी नीतिशकुमार यांच्यावर केला. त्याचबरोबर पंतप्रधानांकडून पूरस्थितीची पाहणी हा फक्त ड्रामा असल्याची टीकाही त्यांनीही लालू प्रसाद यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बिहारमधील पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री सुशील मोदीही त्यांच्यासोबत होते. हवाई पाहणी केल्यानंतर पूर्णिया जिल्ह्यात वरिष्ठ अधिका-यांसोबत झालेल्या बैठकीत मोदींनी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी   बिहारला तात्काळ 500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. बिहारला आवश्यक ते सर्व सहकार्य करु तसंच नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रातून पथक पाठवण्याचंही त्यांनी आश्वासन दिलं आहे. 

बिहारमधल्या या पूरामध्ये आतापर्यंत शेकडो लोकांचे बळी गेले आहेत. मागच्या काही दिवसात आसाम, बिहार, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगालला  पूराचा मोठा फटका बसला आहे. आसाममध्ये २१ जिल्ह्यातील २२.५ लाख लोकांना पुराचा फटका बसला यामध्ये 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे.

योगी आदित्यनाथ यांनी केली हवाई पाहणीउत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोण्डा, श्रावस्ती, बलरामपुर बहराइच जिल्ह्यात पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी केली. पूरग्रस्त भागातील मदत कार्यात हयगय सहन केली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. बहराइचमध्ये ऐरिया गावात त्यांनी पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. कर्नलगंजमध्ये पुरात मृत्युमुखी पडलेल्या दोन नागरिकांच्या नातेवाइकांना त्यांनी प्रत्येकी चार लाख रुपये दिले. 

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवNarendra Modiनरेंद्र मोदी