शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

घरखरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर; बिल्डर दिवाळखोर झाल्यास मिळणार त्यांच्या संपत्तीतील वाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2018 15:56 IST

मोदी सरकारच्या निर्णयाचा लाखो लोकांना फायदा होणार

नवी दिल्ली: निर्माणाधीन प्रकल्पांमध्ये घर खरेदी करणाऱ्यांना मोदी सरकारनं मोठा दिलासा आहे. केंद्र सरकारनं दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहितेत मोठे बदल केले आहेत. या कायद्यातील बदलांना आज सकाळी झालेल्या कॅबिनेट बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामुळे एखादा विकासक दिवाळखोर निघाल्यास त्याच्या संपत्तीत घर खरेदीदारांचाही वाटा असेल. आतापर्यंत फक्त प्रकल्पासाठी कर्ज देणाऱ्या बँकांनाच दिवाळखोर विकासकाच्या संपत्तीत वाटा दिला जात होता. मात्र यापुढे प्रकल्पात घर खरेदी करणाऱ्यांचाही विकासकाच्या संपत्तीत वाटा असणार आहे. ग्रेटर नोयडासह देशातील अनेक भागांमधील निर्माणाधीन प्रकल्पांचं काम रखडलं आहे. विकासक दिवाळखोर झाल्यानं घर खरेदी करणाऱ्या हजारो लोकांचे पैसे या प्रकल्पांमध्ये अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारचा हा निर्णय हजारो लोकांसाठी दिलासादायक ठरु शकतो. 'विकासक दिवाळखोर झाल्यास त्याच्या संपत्तीचा लिलाव करण्यात येतो. यामध्ये विकासकाला कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकांना हिस्सा दिला जातो. त्याच धर्तीवर प्रकल्पांमध्ये पैसा गुंतवून घर खरेदी करणाऱ्यांनाही हिस्सा देण्यात यावा,' अशी शिफारस दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहितेत बदल करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीनं केली होती. विकासक दिवाळखोर झाल्यामुळे त्याच्या प्रकल्पात गुंतवणूक करणाऱ्यांना वाऱ्यावर सोडता येणार नाही, अशी अर्थ मंत्रालयाची भूमिका आहे. पैसे गुंतवूनही खरेदीदारांना घराचा ताबा न मिळाल्यास त्यांचे सर्वच पैसे बुडतील, असंही अर्थ मंत्रालयाचं मत आहे. विकासकाच्या संपत्तीचा लिलाव झाल्यानंतर, त्यातील किती टक्के रक्कम घर खरेदीदारांना मिळेल, यासाठी काही निकष असणार आहेत. यामध्ये विकासकावर नेमकं किती रुपयांचं कर्ज आहे, याचा विचार सर्वप्रथम करण्यात येईल. यानंतर किती खरेदीदारांना घरांचा ताबा मिळालेला नाही, ही बाब विचारात घेण्यात येईल. विकासकाची संपत्ती विकून नेमकी किती रक्कम मिळेल आणि त्यातून किती खरेदीदारांना पैसे दिले जाऊ शकतात, याचाही विचार अशावेळी करण्यात येईल. बँका आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करुन याबद्दलचा निर्णय घेतला जाईल.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीReal Estateबांधकाम उद्योग