शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र' ट्रस्टला मिळालं पहिलं दान, मोदी सरकारनं दिला एक रूपया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 08:50 IST

शिलान्यासाला सर्व मुख्यमंत्र्यांना बोलाविणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी 'श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र' ट्रस्ट स्थापन करण्याची घोषणा बुधवारी लोकसभेत केली. या ट्रस्टमध्ये 15 सदस्य असणार आहे. दरम्यान,  या ट्रस्टला केंद्र सरकारमार्फत एक रुपयाचे दान देण्यात आले आहे. ट्रस्टला मिळालेले हे पहिले दान आहे. 

केंद्र सरकारने 'श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र' ट्रस्टला एक रूपया दान करण्याचे कारण म्हणजे ट्रस्ट अयोध्येतील राम मंदिर बांधण्याच्या दिशेने काम सुरू करू शकेल. केंद्र सरकारने हे दान गृह मंत्रालयाचे सचिव डी. मुर्मू यांच्यामार्फत दिले. यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, ट्रस्ट स्थावर मालमत्तेसह कोणत्याही अटीशिवाय कोणत्याही व्यक्तीकडून दान, अनुदान, योगदान घेऊ शकते. 

दरम्यान, राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने 5 फेब्रुवारीपूर्वी ट्रस्ट स्थापन करावा तसेच मुस्लिमांना मशिदीसाठी अयोध्येत 5 एकर जागा द्यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार केंद्र सरकारने काल 'श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र' ट्रस्ट स्थापन करण्याची घोषणा केली. याचबरोबर, उत्तर प्रदेश सरकारने रामजन्मभूमीपासून 20 ते 25 किमी अंतरावर मुस्लिमांना मशिदीसाठी 5 एकर जमीन देण्याचे ठरविले आहे. 

नरेंद्र मोदींनी केली लोकसभेत घोषणा" src="https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/686x514/jdjdd45ffff_202002366418.jpg"/>

'श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र' मधील 15 सदस्यांची नावे ...1. के परासरन (सुप्रीम कोर्टातील वकील)2. शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वतीजी (प्रयागराज)3. जगतगुरु मधवाचार्य स्वामी (कर्नाटकमधील पेजावर मठाचे पीठाधीश्वर)4. युगपुरुष परमानंदजी महाराज (अखंड आश्रम प्रमुख, हरिद्वार)5. स्वामी गोविंद देव गिरी (प्रवचनकर्ता)6. विमलेंद्र मोहन प्रताप मिश्र (अयोध्या राजपरिवाराचे वंशज)7. डॉ. अनिल मिश्र (होमिओपॅथिक डॉक्टर)8. कामेश्वर चौपाल (पटना)9. महंत दिनेंद्र दास (निर्मोही आखाडा , अयोध्या)10. बोर्ड ऑफ ट्रस्टी द्वारा नियुक्त सदस्य11. बोर्ड ऑफ ट्रस्टी द्वारा नियुक्त सदस्य12. केंद्राचा प्रतिनिधी13. राज्याचा प्रतिनिधी14. अयोध्येचे जिल्हाधिकारी15. ट्रस्टी द्वारा नियुक्त अध्यक्ष

शिलान्यासाला सर्व मुख्यमंत्र्यांना बोलाविणारराममंदिराच्या शिलान्यासाला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मोदी सरकार निमंत्रण देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ट्रस्ट स्थापन करण्याबाबत मोदी सरकारने डिसेंबरमध्येच मार्गदर्शक तत्वे तयार केली होती. मात्र या ट्रस्टमध्ये राजकीय नेत्यांना सदस्य म्हणून घ्यायचे की नाही याबद्दल सरकारचा निर्णय होत नव्हता. ट्रस्ट कसा असावा याची रूपरेषा केंद्र सरकारने ठरविली आहे. यापूर्वी राममंदिराच्या उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेने बिहारचे तत्कालीन आमदार कामेश्वर चौपाल यांच्या हस्ते पायाभरणी समारंभ केला होता. चौपाल हे दलित समाजातील व विश्व हिंदू परिषदेचे सहसचिव होते.

(Ayodhya Case :राममंदिराच्या उभारणीसाठी १५ सदस्यांचा स्वायत्त ट्रस्ट; नरेंद्र मोदींनी केली लोकसभेत घोषणा)

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरNarendra Modiनरेंद्र मोदीAyodhyaअयोध्या