शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मोदी एअरप्लेन मोडवर, वर्क मोड नाहीच - राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 01:58 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ मोदी केवळ ‘स्पीकर’ आणि ‘एअरप्लेन’ मोडवर आहेत. ते कधीही वर्क मोडचा वापर करीत नाहीत, असा जोरदार टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकात प्रचार करताना लगावला.

बंगळुरु - पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ मोदी केवळ ‘स्पीकर’ आणि ‘एअरप्लेन’ मोडवर आहेत. ते कधीही वर्क मोडचा वापर करीत नाहीत, असा जोरदार टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकात प्रचार करताना लगावला.मतदानाला आता अवघे चार दिवस उरले असताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या काळात झालेल्या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी कोलार येथे सायकल आणि बैलगाडीतून प्रवास केला. प्रचारानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी २०१४ च्या निवडणुका जिंकल्यापासून मोदी यांनी केलेल्या कामांचा जाब मागितला.  मोदी यांनी इंधन दरवाढीच्या नावाने जनतेची लूट सुरू केली आहे. या सरकारने या लुटीतून १० लाख कोटी कमावल्याचा टोलाही त्यांनी लागवला.भाजपाचा पलटवार- राहुल गांधी यांनी ‘एंटरटेन्मेंट मोड’वर असल्याचा पलटवार भाजपाचे प्रवक्ते जीव्हीएल राव यांनी केला.-अनेक जण केवळ मनोरंजनाच्या राहुल यांच्या रॅलीमध्ये सहभागी होतात, अशी टीकाही त्यांनी केली.आधुनिक तंत्रज्ञानाला विरोधीपक्षांचा विरोध - नरेंद्र मोदींची टीकाआधार कार्ड असो किंवा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन (इव्हीएम) या सारख्या आधुनिक तंत्रज्ञानयुक्त गोष्टींना विरोधक सातत्याने विरोध करीत असल्याचीटीका पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी केली. मात्र कौशल्यविकास व संशोधन यांना प्राधान्य देऊन त्यांच्या आधारे भाजपला आधुनिक भारत घडवायचा आहे, असे त्यांनी सांगितले. नरेंद्र मोदी अ‍ॅपच्या माध्यमातून ते भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते.2560 एकूण उमेदवार रिंगणात391 फौजदारी गुन्हा असलेलेपाच वर्षांचा कारावासभाजपा उमेदवारांपैकी ५८ जणांवर गंभीर स्वरुपाचे फौजदारी गुन्हे आहेत. या गुन्ह्यात ते दोषी आढळल्यास कमीतकमी पाच वर्षांचा कारावास होऊ शकतो. काँग्रेसच्या ३२ जणांवर व जनता दल (सेक्युलर)च्या २९ जणांवर गंभीर स्वरुपाचे फौजदारी गुन्हे दाखल आहेत.३९१ उमेदवारांवर फौजदारी गुन्हा; भाजपा आघाडीवरकर्नाटकमध्ये १२ मे रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकांतील एकुण उमेदवारांपैैकी ३९१ उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. काँग्रेस, भाजप, जनता दल (सेक्युलर) या महत्वाच्या पक्षांच्या एकुण उमेदवारांपैैकी २४% उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल असून त्यांची संख्या भाजपमध्ये सर्वाधिक म्हणजे ८३ इतकी आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या स्वयंसेवी संस्थेने हा अहवाल दिला आहे. 

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी