शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

IPLमधील अष्टपैलू क्रिकेटपटूवर प्रेम करायची मॉडेल तान्या सिंह? समोर येतेय धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 16:40 IST

Model Tanya Singh: सूरतमधील २८ वर्षीय मॉडेल तान्या सिंह हिच्या संशयास्पद आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणात अष्टपैलू क्रिकेटपटू अभिषेक शर्मा यांचं नाव समोर आलं आहे.

सूरतमधील २८ वर्षीय मॉडेल तान्या सिंह हिच्या संशयास्पद आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणात अष्टपैलू क्रिकेटपटू अभिषेक शर्मा यांचं नाव समोर आलं आहे. कॉल डिटेल्स पाहिल्यानंतर तान्या हिने अभिषेक याच्याशीच सर्वार्धिक संभाषण केल्याचं समोर आलं आहे. त्याबरोबरच अभिषेक याला चौकशीसाठी सूरत येथे बोलावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

सूरतमधील वेसू परिसरात राहणारी तान्या भवानी सिंह ही मूळची राजस्थानची आहे. तिचं कुटुंब वेसू येथील हॅप्पी एलिगेंस रेसिडेन्समध्ये राहते. तान्याचे वडील एका मिलमध्ये काम करायचे. तान्या मॉडेलिंग, फॅशन डिझायनिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंट काम करत होती. रविवारी रात्री ती उशिरा घरी आली. त्यानंतर तिने आत्महत्या केली, असे सांगण्यात आले.  सकाळी तिचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत सापडला.

कुटुंबीयांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर तान्या हिचा मृतदेह सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या दरम्यान, पोलिसांनी मॉडेलच्या मोबाईल फोनची कॉल डिटेल्स, मेसेज आणि चॅटची सखोल पडताळणी केली. त्यामधून ती अनेक लोक आणि एका बड्या व्यक्तीच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली. आता या सर्वांना चौकशीसाठी बोलावण्याची तयारी पोलिसांनी केली आहे.

तान्याच्या फोनच्या तपासणीमधून ती रणजी क्रिकेटपटू आणि आयपीएलमधील अष्टपैलू खेळाडू अभिषेक शर्मा याच्या संपर्कात होती, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, तान्या हिच्या फोनच्या तपास करताना संशयास्पद क्रमांकावर फोन केले जात आहेत. तान्या ही अभिषेकच्या थेट संपर्कात होती किंवा नाही, हे तपासामधूनच समोर येणार आहे.

दरम्यान, तान्या हिने अभिषेक वर्मा याला तिच्या फोनमधून एकतर्फी मेसेज पाठवण्यात आले होते. या संदर्भात पोलिसांकडून अभिषेक याला कल्पना देण्यात आली आहे. त्याला चौकशीसाठी बोलवायचे की नाही याचा निर्णय येत्या काही दिवसांमध्ये घेतला जाणार आहे. एवढंच नाही तर तान्याच्या मोबाईलमध्ये काही क्रिकेटपटूंसोबत तिचे फोटोही सापडले आहेत. दरम्यान, तान्या ही कुठल्या तरी क्रिकेटपटूच्या प्रेमात पडली होती आणि जवळच्या नात्यामध्ये होती. सध्या पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीIPLआयपीएल २०२३Gujaratगुजरात