शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 05:54 IST

मोबाइल फोनला सिग्नल देणारा ‘ब्लूबर्ड ब्लॉक-२’ हा संचार उपग्रह अवकाशात पोहोचला 

श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश) : डोंगराळ भागात, जंगलात, दुर्गम गावांमध्ये, समुद्रात, सीमावर्ती भागांमध्ये, अगदी पूर, भूकंप तथा चक्रीवादळासारख्या आपत्तीच्या वेळीही कॉल, मेसेज आणि इंटरनेट उपलब्ध होणार आहे. हा बदल शक्य करणारा थेट मोबाइल फोनला सिग्नल देणारा ‘ब्लूबर्ड ब्लॉक-२’ हा अत्याधुनिक संचार उपग्रह अवकाशात पोहोचला आहे. भारताच्या इस्रोने आपल्या सर्वात बलाढ्य एलव्हीएम-३ रॉकेटच्या मदतीने हा सर्वांत मोठा उपग्रह अवकाशात पोहोचवला आहे.

ख्रिसमसच्या आदल्या दिवशी श्रीहरिकोटातून यशस्वीपणे पार पडलेली ही प्रक्षेपण मोहीम केवळ वैज्ञानिक यश नाही, तर जगभरातील मोबाइल वापरकर्त्यांसाठी कनेक्टिव्हिटीचा नवा अध्याय आहे. ६,१०० किलो वजनाचा हा उपग्रह पृथ्वीच्या निम्न कक्षेत अचूकपणे स्थापन करून इस्रोने भारताची जागतिक स्पेस-टेक सामर्थ्य पुन्हा सिद्ध केले आहे.

याचा नेमका फायदा काय? नेटवर्क बंद पडलं तरी एसओएस कॉल, मदतीचा मेसेज, रेस्क्यू टीमशी संपर्क करता येऊ शकेल. आपत्तीच्या वेळी हा उपग्रह लाइफलाइन ठरू शकतो.

ही मोठी गोष्ट का आहे? इस्रोने जगाला दाखवून दिलं – “आम्ही हे करू शकतो.” आता जगातल्या कंपन्या इस्रोलाच लाँचसाठी पसंती देतील.भारताला यामधून पैसे आणि प्रतिष्ठा दोन्ही मिळेल. ही मोहीमही पैसे घेऊन केली आहे, म्हणजेच भारताला परकीय चलन मिळाले. 

नवीन फोन घ्यावा लागेल का? नाही. हा उपग्रह सामान्य स्मार्टफोनसाठीच डिझाइन केला आहे. वेगळा सॅटेलाइट फोन, अँटेना काहीच लागत नाही.

उपग्रह खास का? याचा अँटेना खूप मोठा आहे एकाच वेळी लाखो मोबाइल फोनशी संपर्क करू शकतो.

‘नो सिग्नल’ शब्द इतिहासजमा  अजून असे उपग्रह अवकाशात सोडले जातील. त्यामुळे मोबाइल नेटवर्क जगभर समान होईल.

हे भारताच्या अंतराळ प्रवासातील एक गौरवशाली पर्व आहे. जागतिक प्रक्षेपण बाजारातील भारताची वाढती भूमिका आणखी मजबूत झाली आहे.नरेंद्र मोदी, पंतप्रधान

गगनयान मोहिमेच्या दृष्टीने मानवरहित उड्डाणे पूर्ण करणे हे पुढील उद्दिष्ट असून, आम्ही त्याच दिशेने पुढे जात आहोत.व्ही. नारायणन, अध्यक्ष, इस्रो

English
हिंदी सारांश
Web Title : Mobile Connectivity Everywhere: ISRO's Satellite Ensures Internet, Calls in Remote Areas.

Web Summary : ISRO's 'Bluebird Block-2' satellite ensures mobile connectivity in remote areas and during disasters. This eliminates 'no signal' zones, enabling calls, messages, and internet access globally without needing new phones. This success enhances India's space-tech power and attracts international launch contracts.
टॅग्स :isroइस्रो