ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि.१० - अर्थमंत्री अरूण जेटली यांनी मांडलेल्या बजेटमध्ये सिगारेट, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांवरील कर वाढवले असून एलईडी, एलसीडी टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटरवरील कर कमी करण्यात आला आहे. त्यामुळे सिगारेट, गुटखा, पानमसाला,तंबाखूजन्य पदार्थ, आयात केलेले पोलाद तसेच शीतपेये इत्यादी महागणार आहेत. तर मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटरसह तेल, साबण स्वस्त होतील. तसेच परदेशातून आणलेल्या ४५ हजार रूपयांपर्यंतच्या सामानावर कर नसल्याने या वस्तू आणणेही स्वस्त झाले आहे. दरम्यान इंटरनेट, मोबाइलच्या जाहिरातींवरील उत्पन्नावरही आता सेवा कर लावण्यात आला आहे.
काय झाले महाग - सिगारेट, तंबाखू, पानमसाला, औषधे, आयात केलेले पोलाद, शीतपेये
काय स्वस्त - १९ इंचांखालील एलईडी, एलसीजडी टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटर, ब्रॅन्डेड कपडे.