शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी बुरहान वानीच्या खात्म्याला 2 वर्ष पूर्ण, काश्मीर खोऱ्यात इंटरनेट सेवा बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 10:37 IST

भारतीय लष्करानं हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला 8 जुलै 2016 रोजी कंठस्नान घातले होते. या घटनेला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत.

श्रीनगर - भारतीय लष्करानं हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला 8 जुलै 2016 रोजी कंठस्नान घातले होते. या घटनेला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जम्मू काश्मीर प्रशासनानं काश्मीर खोऱ्यातील संवेदनशील ठिकाणांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. शिवाय, इंटरनेट सेवादेखील बंद ठेवली आहे. तर दुसरीकडे, दहशतवाद्यांनी बंदची हाक दिल्यानं आज एका दिवसासाठी अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे.  

पोलीस महासंचालक एस.पी.वैद यांनी सांगितले की, सध्या जम्म काश्मीरमधील कायदा सुव्यवस्थेची स्थिती चांगली नाहीय. त्यामुळे भाविकांना सुरक्षितरित्या अमरनाथा यात्रा करता यावी, यासाठी आम्ही सर्वेतोपरी प्रयत्न करत आहोत.  दहशतवाद्यांकडून रविवारी बंदची हाक देण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यामुळे एक दिवसासाठी आम्ही यात्रा थांबवली आहे. काश्मीर खोऱ्यातील तणावाची स्थिती पाहता, भाविकांनाही प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

8 जुलै 2016ला बुरहान वानीचा खात्माभारतीय लष्करानं 8 जुलै 2016 ला दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग परिसरात बुरहान वानीचा खात्मा केला होता. त्राल येथील रहिवासी असलेल्या बुरहान वानीला चकमकीदरम्यान कंठस्नान घालण्यात आले. हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी काश्मीर खोऱ्यामध्ये दहशतवाद्यांचा पोस्टर बॉय म्हणून ओळखला जायचा. त्याच्या खात्म्यानंतर काश्मीर खोऱ्यात ठिकठिकाणी हिंसक निदर्शनं करण्यात आली होती. 

परिसरात रेड अलर्ट जारीमिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी बुरहान वानी यांच्या खात्मा करण्याच्या घटनेला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर दहशतवादी कारवाई होण्याचा धोका लक्षात घेता श्रीनगर हायवेपासून 300 किलोमीटर परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. शिवाय, जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रन्ट (जेकेएलएफ) चा अध्यक्ष यासीन मलिकलाही ताब्यात घेण्यात आले आहे.  

इंटरनेट सेवा बंददक्षिण काश्मीरमधील एका गावात शोधमोहीमेदरम्यान शनिवारी जमावानं सुरक्षा दलातील जवानांवर दगडफेक केली. यावेळी जवानांनी प्रत्युत्तरासाठी केलेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला. यामुळे काश्मीर खोऱ्यात तणाव निर्माण झाला आहे. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम, शोपिया, अनंतनाग आणि पुलवामामध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. 

टॅग्स :terroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान