शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जेलमध्ये मोबाइल? कैदी, कर्मचाऱ्यांना शिक्षा; नवा तुरुंग कायदा, १३० वर्षे जुन्या कायद्याची जागा घेणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 13:07 IST

कारागृहात मोबाइल फोन आदी बंदी असलेल्या वस्तूंचा वापर करणारे कैदी आणि तुरुंग कर्मचाऱ्यांसाठी शिक्षेची तरतूद हे या अधिनियमाचे मुख्य वैशिष्ट्य असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी एका निवेदनात सांगितले.

नवी दिल्ली : विद्यमान तुरुंग कायद्यातील त्रुटी दूर करण्यासह कैद्यांच्या पुनर्वसनावर अधिक भर देण्यासाठी केंद्राने ‘आदर्श तुरुंग अधिनियम-२०२३’ हा नवीन कायदा तयार केला असून, तो स्वातंत्र्यपूर्व १३० वर्षे जुन्या कायद्याची जागा घेईल.कारागृहात मोबाइल फोन आदी बंदी असलेल्या वस्तूंचा वापर करणारे कैदी आणि तुरुंग कर्मचाऱ्यांसाठी शिक्षेची तरतूद हे या अधिनियमाचे मुख्य वैशिष्ट्य असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी एका निवेदनात सांगितले. नवीन कायद्यात कैद्यांना विधि साहाय्य, ‘पॅरोल’, ‘फर्लो’ आणि तुरुंगातील चांगल्या वर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी मुदतपूर्व सुटका आदी तरतुदी आहेत.देशातील कारागृहे व तेथील कैदी हा राज्याचा विषय आहे. या संदर्भातील विद्यमान कायद्यात अनेक त्रुटी आहेत. आधुनिक काळानुरूप तुरुंग व्यवस्थापनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचे गेल्या काही वर्षांपासून जाणवत होते, असे निरीक्षण मंत्रालयाने नोंदविले असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

विद्यमान कायदा मुख्यत्वे गुन्हेगारांना ताब्यात घेण्यावर व तुरुंगांत शिस्त व सुव्यवस्था ठेवण्यावर केंद्रित आहे. त्यात कैद्यांमध्ये सुधारणा घडवून आणण्याची व पुनर्वसनाची कोणतीही तरतूद नाही. विद्यमान कायद्यातील त्रुटी दूर करणे, तुरुंग व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा उपयोग आदी उद्देशाने आदर्श तुरुंग अधिनियम २०२३ तयार करण्यात आला आहे.

टॅग्स :jailतुरुंगPrisonतुरुंग