शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Mobile: तुमच्या फाेनमध्ये हे ॲप्स तर नाहीत ना?, ६० ॲप्समध्ये सापडले मालवेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 12:09 IST

Mobile: गुगल प्ले स्टोअरवरील ६० अधिकृत ॲप्समध्ये ‘गोल्डोसन’नामक मालवेअर आढळून आला आहे. त्यामुळे जगातील १० कोटी अँड्राॅइड फोन वापरकर्त्यांच्या फोनमधील डेटाला धोका निर्माण झाला आहे.

नवी दिल्ली : गुगल प्ले स्टोअरवरील ६० अधिकृत ॲप्समध्ये ‘गोल्डोसन’नामक मालवेअर आढळून आला आहे. त्यामुळे जगातील १० कोटी अँड्राॅइड फोन वापरकर्त्यांच्या फोनमधील डेटाला धोका निर्माण झाला आहे.

‘एमसीॲफी’च्या रिसर्च टीमने हा मालवेअर शोधून काढला आहे. हा मालवेअर वापरकर्त्याच्या स्मार्टफोनमधील इन्स्टॉल्ड ॲप्स, वायफाय आणि ब्लूटूथने जाेडलेली उपकरणे, जीपीएस लोकेशन यांची माहिती चोरू शकतो. वापरकर्त्याला कळू न देता बॅकग्राउंडला ॲड क्लिक करून तो ॲड घोटाळाही करू शकतो. केवळ माहिती चोरण्यासाठीच हा मालवेअर डिझाइन करण्यात आला आहे. अँड्रॉइडच्या सर्वाधिक नव्या आवृत्तीतीलसुद्धा १० टक्के डेटा हा मालवेअर चोरू शकतो. यापैकी बहुतांश ॲप्स हे फाेटाे एडिटिंग आणि व्हिडीओशी संबंधित आहेत.हे आहेत धोकादायक ॲप्समालवेअर आढळलेल्या ॲप्समध्ये स्वाइप ब्रिक ब्रेकर, मनी मॅनेजर एक्स्पेन्स अँड बजेट, एलडॉटपॉइंट व एलडॉटपे यासारख्या १०-१० लाखांपेक्षा अधिक डाऊनलोड्स असलेल्या लोकप्रिय ॲप्सचा समावेश आहे.

मालवेअर असे करतो नुकसान हा मालवेअर दर दोन दिवसांनी सक्रिय होऊन स्मार्टफोनमधील माहिती चोरून सी २ सर्व्हरला पाठवतो. संसर्गित ॲप जेव्हा स्मार्टफोन वापरकर्ता उघडतो, तेव्हा हा मालवेअर स्मार्टफोनवर स्वत:ला रजिस्टर करून घेतो आणि फोनमधील माहिती गोळा करून दूरवरच्या सर्व्हरला पाठवायला सुरुवात करतो. संसर्गित ॲप्सला फोनमध्ये देण्यात आलेल्या परवानग्यांनुसार (परमिशन्स) मालवेअर फोनमधील माहिती चोरत राहतो. म्हणजेच जेवढ्या जास्त परवानग्या तेवढी माहितीची चोरी जास्त होणार.

टॅग्स :Mobileमोबाइलcyber crimeसायबर क्राइम