शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

फोन चार्जिंगला होता आणि कॉल आला...; 16 वर्षीय मुलाचा मृत्यू; तुम्ही करत नाही ना 'ही' चूक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 16:17 IST

16 वर्षीय मुलासोबत जे घडले त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

आजच्या धावपळीच्या जीवनात मोबाईलचा वापर आपल्या आयुष्यातील जवळपास प्रत्येक क्षेत्रात होत आहे. बातम्या वाचणे, रिचार्ज करणे, रिमोट म्हणून वापरणे, अचानक लाईट गेल्यावर टॉर्च लावणे, गुगलवर त्यांच्या प्रश्नांची उत्तरे शोधणे किंवा YouTube व्लॉग पाहणे असो. अशी अनेक कामे आहेत जी मोबाईलवर झटपट करता येतात. असं असताना आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

उत्तर प्रदेशच्या बदायूंतील 16 वर्षीय मुलासोबत जे घडले त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. एका मोठ्या ब्रँडचा मोबाईल चार्जिंगला होता आणि तो मुलगा फोनवर बोलत होता. सोमवारी रात्री अचानक विजेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. बिसौली येथील रहिवासी सत्यम शर्मा याने स्मार्टवॉच घातले होते आणि त्याचा फोन चार्ज होत असताना फोन वाजला आणि बोलत असताना स्फोट झाला.

सत्यमच्या कुटुंबीयांनी दावा केला की, कॉल येताच मुलाला विजेचा धक्का बसला आणि तो जमिनीवर पडला. आई-वडिलांनी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. बिसौलीचे एसएचओ संजीव शुक्ला म्हणाले, 'प्राथमिक तपासात विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. कुटुंबीयांनी तक्रार केल्यास आवश्यक ती कारवाई करू. 

सत्यमने यावर्षी दहावीची परीक्षा दिली होती आणि त्याच्या कुटुंबीयांनी त्याला फोन घेण्यासाठी पैसे दिले होते. सत्यमला मोठ्या ब्रँडचे महागडे फोन आवडायचे. त्याने 20,000 मध्ये फोन आणि स्मार्टवॉच विकत घेतला. सोमवारी त्याच्या फोनची बॅटरी संपली आणि त्याने तो चार्जिंगसाठी ठेवला होता. त्याच दरम्यान ही घटना घडली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"