शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

मणिपूर पुन्हा पेटलं! जमावाने भाजप कार्यालयाला लावली आग, दोन विद्यार्थ्यांच्या हत्येचा निषेध सुरुच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 11:31 IST

इंफाळमध्ये भाजप प्रदेशाध्यक्षा शारदा देवी यांच्या घराचीही तोडफोड करण्यात आली.

मणिपूरमधील परिस्थिती पुन्हा बिघडत चालली आहे. मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये 3 मेपासून सुरू असलेला हिंसाचार थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. एकीकडे मणिपूरमध्ये हिंसाचार वाढत आहे. तर दुसरीकडे सहा महिन्यांसाठी अफ्स्पा वाढवण्यात आला आहे. दरम्यान, दोन बेपत्ता विद्यार्थ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ याठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. दुसरीकडे, 27 सप्टेंबरला थौबल जिल्ह्यातील भाजप कार्यालयाला जमावाने आग लावली. याशिवाय, इंफाळमध्ये भाजप प्रदेशाध्यक्षा शारदा देवी यांच्या घराचीही तोडफोड करण्यात आली.

प्रेस नोट जारी करत पोलिसांनी गेल्या 24 तासांत राज्यातील वातावरण तणावपूर्ण असले तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे. हिंसाचाराशी संबंधित घटनांप्रकरणी 1697 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सीबीआयचे विशेष संचालक अजय भटनागर त्यांच्या पथकासह बुधवारी विद्यार्थी हत्या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष विमानाने इंफाळ येथे पोहोचले.

राजधानी इंफाळसह अनेक ठिकाणी आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये हिंसक चकमक झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि बनावट बॉम्बचा वापर केला. तसेच पेलेट गनमधून गोळीबार केला. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले. त्याचवेळी एका विद्यार्थ्याच्या डोक्यात कोंडा घुसल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या दोन दिवसांत इंफाळ खोऱ्यात झालेल्या निदर्शनांमध्ये 50 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी बहुतांश विद्यार्थी आहेत.

अफ्स्पा लावण्याचा निर्णयराज्यातील डोंगराळ भागात अफ्स्पा (AFSPA) लागू राहील. सरकारने 1 ऑक्टोबरपासून सहा महिन्यांसाठी मुदतवाढ दिली आहे. यातून केवळ 19 पोलीस ठाण्याचे क्षेत्र वेगळे ठेवण्यात आले आहे. राज्याचा उर्वरित भाग अस्ताव्यस्त घोषित करण्यात आला आहे. AFSPA च्या बाहेर ठेवण्यात आलेल्या 19 पोलीस ठाण्यांमध्ये इम्फाळ, लेनफले, सिटी, सिंगजमेई, सेकमाई, लामसांग, पटसोई, वांगोई, पोरोम्पत, हांगेंग, लमलाई, इरिलबुंग, लेमखोंग, थोबुल, बिष्णुपूर, नंबोल, मोइरोंग, काकबचिंग आणि जिबचिंग यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारBJPभाजपा