शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

आमदार, खासदारांच्या वकिलीस आक्षेप; बार कौन्सिलने काढल्या नोटिसा, पाचशे लोकप्रतिनिधी रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:44 IST

लोकप्रतिनिधींना वकिली व्यवसायही सुरू ठेवण्यास आक्षेप घेणारी एक याचिका बार कौन्सिल आॅफ इंडियाकडे दाखल झाली, असून कौन्सिलने संबंधित लोकप्रतिनिधींना त्यावर नोटीस जारी केली आहे.

नवी दिल्ली : लोकप्रतिनिधींना वकिली व्यवसायही सुरू ठेवण्यास आक्षेप घेणारी एक याचिका बार कौन्सिल आॅफ इंडियाकडे दाखल झाली, असून कौन्सिलने संबंधित लोकप्रतिनिधींना त्यावर नोटीस जारी केली आहे.सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे अ‍ॅड. अश्विनी उपाध्याय यांनी ही याचिका केली असून वकील असलेल्या लोकप्रतिनिधींना त्या पदावर असताना वकिली करण्यास मज्जाव करावा, अशी त्यांची मागणी आहे. कौन्सिलच्या शिस्तभंग समितीने यावर वकील असलेल्या सर्व आमदार खासदारांना नोटिसा जारी केल्या असून दोन आठवड्यांत त्यांचे उत्तर मागविले आहे. बी. सी. ठाकूर, आर. जी. शहा व डी. पी. धाल या कौन्सिल सदस्यांचा या समितीत समावेश असून २१ जानेवारी रोजी होणा-या बैठकीत यावर निर्णय होणे अपेक्षित आहे. ज्यांच्याकडे वकिली व्यवसायाची सनद आहे अशा आमदार-खासदारांची संख्या ५०० च्या घरात असावी, असा अंदाज आहे.याचिकाकर्त्याचे प्रामुख्याने तीन मुद्देआमदार, खासदारांना देशाच्या निधीतून पगार व भत्ते मिळत असल्याने ते सरकारचे पगारदार ठरतात. बार कौन्सिलच्या नियमांनुसार अशा पगारदारांना वकिली व्यवसाय करता येत नाही. शिवाय अनेक वेळा ते सरकारच्या विरोधात प्रकरणे चालवितात.भ्रष्टाचार निर्मूलन कायदा व दंड प्रक्रिया संहितेनुसार आमदार-खासदार हे लोकसेवक (पब्लिक सर्व्हंट) असतात. या नात्यानेही त्यांना लोकप्रतिनिधी असताना वकिली करू दिली जाऊ शकत नाही.अन्य लोकप्रतिनिधींना वकिली करू द्यायची नाही व आमदार-खासदारांना करू द्यायची, हा पक्षपात आहे. याने राज्यघटनेच्या अनुच्छेद १४ अन्वये समानतेच्या तत्वाचा भंग होतो.

टॅग्स :MLAआमदार