शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

Diya Kumari : "भाजपाचं सरकार येणार आहे, 4 दिवसांत जाल..."; दिया कुमारींचा दबंग Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 12:50 IST

Diya Kumari : जयपूरच्या विद्याधर नगर विधानसभा मतदारसंघातून नवनिर्वाचित आमदार दिया कुमारी यांचा एक दबंग व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राजस्थानमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या दिया कुमारी फुल एक्शन मोडमध्ये दिसत आहे. जयपूरच्या विद्याधर नगर विधानसभा मतदारसंघातून नवनिर्वाचित आमदार दिया कुमारी यांचा एक दबंग व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये भाजपा आमदार फोनवर पोलीस अधिकाऱ्यांवर निशाणा साधत आहेत. 

"अशोक गेहलोत यांनी तुम्हाला आणलंय. चार दिवसांत भाजपाचं सरकार येणार आहे. तुम्हाला इथून हटवलं जाईल... अशा ठिकाणी जाल की कुठे गेलाय हे कळणारही नाही" असं दिया कुमारी यांनी पोलीस अधिकाऱ्यांना म्हटलं आहे. हा व्हायरल व्हिडीओ जयपूरच्या झोटवाडा पोलीस ठाण्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरमध्ये 8 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मुलीच्या वडिलांनी झोटवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

वडिलांचा आरोप आहे की, त्यांची 8 वर्षांची मुलगी तिच्या 5 वर्षाच्या भावासोबत शाळेत जाते. स्कूल व्हॅन चालक अब्दुल मजीद गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुलीला धमकावत होता आणि बलात्कार करत होता. चालकासह त्याच्या काही मित्रांनीही अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलीच्या वडिलांनी शाळेतून परतत असताना मुलीला एका वेगळ्या घरात नेऊन तिच्या लहान भावाला व्हॅनमध्ये कोंडून ठेवल्याचा आरोपही केला आहे. 

पीडितेच्या कुटुंबीयांनी बाल संरक्षण आयोगाकडे न्याय मागितला आहे.  आयोगाच्या सदस्यांनी पीडितेच्या वडिलांची तक्रार पोलिसांकडे दिली. सुरुवातीला पोलिसांनी याप्रकरणी टाळाटाळ केली, मात्र त्यानंतर सामाजिक संघटनांच्या दबावानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींवर कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या अनेक सामाजिक संघटनांनी शनिवारी रात्री झोटवाडा पोलीस ठाणे गाठलं. 

यानंतर या प्रकरणाची माहिती मिळताच विद्याधर नगरच्या नवनिर्वाचित आमदार दिया कुमारी यांनीही पोलीस ठाणे गाठलं. भाजपा आमदार दिया कुमारी यांनी लोकांची भेट घेतली. तसेच पीडितेच्या कुटुंबीयांकडून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. यानंतर सामूहिक बलात्कारातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.  

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकBJPभाजपाAshok Gahlotअशोक गहलोत