शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

सीमांकनाच्या मुद्द्यावर स्टॅलिन यांनी बोलावली बैठक; भाजपच्या मुख्यमंत्र्यांनाही केले आवाहन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 19:16 IST

एमके स्टॅलिन यांनी 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बैठकीसाठी बोलावले आहे.

MK Stalin : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या सीमांकनाच्या मुद्द्याने देशातील राजकारण तापले आहे. यामुळे उत्तर भारताच्या तुलनेत दक्षिण भारतातील खासदारांची संख्या कमी होईल, असा दावा तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी शुक्रवारी 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सीमांकनाच्या मुद्द्यावर बैठकीसाठी बोलावले आहे. यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपशासित ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांचाही समावेश आहे. 

भाजपच्या मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रणमीडिया रिपोर्ट्सनुसार, एमके स्टॅलिन यांनी या सर्व मुख्यमंत्र्यांना केंद्राच्या प्रस्तावित सीमांकनाला विरोध करण्यासाठी स्थापन केलेल्या संयुक्त कृती समितीमध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पी विजयन, कर्नाटकचे सिद्धरामय्या, तेलंगणाचे रेवंत रेड्डी, आंध्रचे चंद्राबाबू नायडू, पुद्दुचेरीचे एन रंगास्वामी, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी आणि भाजपशासित ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनाही 22 मार्च रोजी चेन्नई येथे होणाऱ्या बैठकीसाठी आमंत्रित केले आहे.

अन्याय होऊ देणार नाही...एमके स्टॅलिन यांनी या राज्यांतील राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनाही बैठकीसाठी बोलावले आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, सीमांकन हा संघराज्यवादावरील एक निंदनीय हल्ला आहे. यामुळे संसदेतील आमचा आवाज कमी होतो आणि लोकसंख्या नियंत्रण करणाऱ्या राज्यांना शिक्षा मिळते. हा अन्याय आम्ही होऊ देणार नाही. दरम्यान, पुढील वर्षी तामिळनाडूत विधानसभा निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर एमके स्टॅलिन हिंदी आणि सीमांकनाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला धारेवर धरत आहेत. 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूDravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागमNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा