शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
3
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
4
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
5
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
6
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
7
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
8
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
9
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
10
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
11
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
12
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
13
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
14
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
15
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
16
तेजीनंतर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण, तरीही चांदी १.१० लाखांच्या पार; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
18
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
19
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
20
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 14:44 IST

आता रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात एमजे अकबर यांना जागा देण्यात आली आहे.

नवी दिल्ली - प्रसिद्ध पत्रकार आणि राजकीय नेते एमजे अकबर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीममध्ये परतले आहेत. केंद्र सरकारने दहशतवादावर पाकिस्तानचा चेहरा उघड करण्यासाठी भारताकडून सर्वपक्षीय शिष्टमंडळ परदेश दौऱ्यावर पाठवण्याचं ठरवले आहे. त्यात एमजे अकबर यांचाही समावेश आहे. ७ वर्षापूर्वी २०१८ साली एका वादानंतर एमजे अकबर यांना परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्रिपद सोडावे लागले होते. 

आता रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात एमजे अकबर यांना जागा देण्यात आली आहे. हे शिष्टमंडळ यूनाइटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, इटली, डेन्मार्कच्या दौऱ्यावर जाणार आहे. एमजे अकबर यांची कूटनिती या मिशनमध्ये महत्त्वाची भूमिका निभावेल. एमजे अकबर यांनी दहशतवादापासून पाकिस्तानविरोधात कायम भूमिका घेतली आहे. ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय सैन्याच्या पराक्रमाचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदींचं कौतुक करताना लोक जे विचार करत नाहीत, ते मोदी शक्य करून दाखवतात असं त्यांनी म्हटलं आहे.

मीटू वादात अडकले होते अकबर

२०१८ साली मी टू वादात एमजे अकबर यांना जोरदार फटका बसला. अनेक माजी महिला सहकाऱ्यांनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यामुळे एमजे अकबर यांना केंद्रीय मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अकबर यांनी त्यांच्यावरील आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हणत पत्रकार प्रिया रमानीविरोधात मानहानीचा दावा केला होता. २०२१ साली दिल्लीतील एका कोर्टाने रमानीला निर्दोष करत सोडून दिले. त्याविरोधात अकबर दिल्ली हायकोर्टात गेले. या वादामुळे त्यांची प्रतिमा मलिन झाली. त्यामुळे राजकीय प्रवासात त्यांना मागे राहावे लागले.

कोण आहेत एमजे अकबर?

एमजे अकबर यांनी दीर्घकाळ पत्रकारिता केली आहे. पत्रकारितेनंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९८९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर बिहारच्या किशनगंज येथे निवडणूक लढवली. २ वर्षांनी १९९१ साली पुन्हा लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. २०१४ साली ते भाजपात सहभागी झाले. १ वर्ष पक्षाचे प्रवक्ते पद सांभाळल्यानंतर २०१५ साली एमजे अकबर यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. त्यानंतर सरकारमध्ये परराष्ट्र राज्यमंत्री बनवण्यात आले. २०१८ साली मी टू आंदोलनात एमजे अकबर यांच्यावरही आरोप झाले आणि त्यांना मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तानterroristदहशतवादीM J Akbarएम. जे. अकबर