शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या तोंडावर मिझोरमच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची बदली, 28ला मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 14:43 IST

निवडणूक आयोगानं मिझोरमचे मुख्य निवडणूक अधिकारी एसबी शशांक यांना हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देमिझोरमचे मुख्य निवडणूक अधिकारी एसबी शशांक यांना हटवण्याचा निर्णय घेतला 40 जागा असलेल्या मिझोरम विधानसभेसाठी या महिन्याच्या 28 तारखेला मतदान होणार मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची निवड करण्यासाठी मुख्य सचिवांकडे नव्या पॅनलची मागणीत्रिपुरातील शरणार्थी ब्रू समुदायातील लोकांना मिझोरमच्या सीमेमध्ये मतदान करता येणार

ऐझॉल- निवडणूक आयोगानं मिझोरमचे मुख्य निवडणूक अधिकारी एसबी शशांक यांना हटवण्याचा निर्णय घेतला आहे. मिझोरममध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून शशांक यांना हटवण्याची मागणी होत होती. राजधानी ऐझॉलसह अनेक शहरातील राजकीय कार्यकर्त्यांनी शशांक यांना हटवण्यासाठी निदर्शनंही केली होती. 40 जागा असलेल्या मिझोरम विधानसभेसाठी या महिन्याच्या 28 तारखेला मतदान होणार आहे. निवडणूक अधिकाऱ्याला हटवण्याची मागणी जोर धरत असतानाच निवडणूक आयोगाची समिती मिझोरममध्ये दाखल झाली होती. त्यांच्या अहवालानंतर निवडणूक अधिकाऱ्याला बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तसेच मिझोरमसाठी नवीन मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची निवड करण्यासाठी मुख्य सचिवांकडे नव्या पॅनलची मागणीही केली आहे. मिझोरमच्या सिव्हिल सोसायटीच्या लोकांनी निवडणूक अधिकारी एसबी शशांक यांना हटवण्यासाठी त्रिपुरातील शरणार्थी ब्रू समुदायातील लोकांना मिझोरमच्या सीमेमध्ये मतदान करण्याची मागणी केली होती. निवडणूक आयोगानं दोन्ही मागण्या मान्य केल्या आहेत. निवडणूक आयोगानं राज्याचे प्रधान सचिव(गृह)ललनुनमाविया चुआऊंगो यांनाही हटवलं आहे. त्यानंतरच शशांक यांना हटवण्याची मागणी जोर धरू लागली होती. चुआऊंगो हे निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करत असल्याची शशांक यांनी तक्रार केली होती.मुख्यमंत्री ललथनहवला यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं होतं. त्या पत्रातून त्यांनी मुख्य निवडणूक अधिका-यांची तक्रार केली होती. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांवरच लोकांचा विश्वास उडाला आहे. 2018ची विधानसभा निवडणूक सुरळीत होण्यासाठी एस. बी. शशांक यांना तात्काळ पदावरून हटवण्याची गरज असल्याचं मत मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रातून मांडलं होतं. 28 नोव्हेंबरला मध्य प्रदेशमध्ये मतदान होणार आहे. राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांतही निवडणुका होत आहेत. पाच राज्यांतील मतदानाची मोजणी 11 डिसेंबरला होणार आहे. 

टॅग्स :Mizoram Assembly Election 2018मिझोराम विधानसभा निवडणूक 2018