शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: पुण्यात झाला महत्त्वाचा प्रयोग; 'कॉकटेल' जादू करणार, लसीकरणाला कलाटणी मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 08:07 IST

Corona Vaccination: पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या संस्थेत हे प्रयोग केले

नवी दिल्ली : कोवॅक्सिन व कोविशिल्ड लस कोरोना रुग्णांना स्वतंत्रपणे देण्यापेक्षा या दोन्ही लसींचे मिश्रण दिल्यास ते अधिक प्रभावी ठरते, असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने केलेल्या प्रयोगांतून आढळून आले आहे.पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या संस्थेत हे प्रयोग केले. या दोन्ही लसींचे मिश्रण दिल्यास त्यामुळे रुग्णाला कोणताही अपाय होत नाही व त्याची प्रतिकारशक्तीही इतर वेळेपेक्षा अधिक वाढते. ९८ जणांवर केलेल्या प्रयोगांनंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.उत्तर प्रदेशमध्ये १८ जणांना नजरचुकीने दोन्ही लसी दिल्या होत्या. त्यांच्या प्रकृतीचाही यात अभ्यास करण्यात आला. त्यांच्यावर कोणताही विपरित परिणाम झाल्याचे आढळले नाही. दोन लसींचे मिश्रण करून ते रुग्णांना दिल्यानंतर नेमका काय परिणाम होतो, असा अभ्यास देशात याआधी झाला नव्हता. आयसीएमआरने म्हटले आहे की, ज्या रुग्णांनी कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन यापैकी कोणत्याही एका लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्यांच्या तुलनेत दोन्ही लसींचे मिश्रण घेतलेल्या रुग्णांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली. विषाणूच्या अल्फा, बिटा, डेल्टा या प्रकारांविरोधात लसींचे मिश्रण परिणामकारक ठरले आहे.लसीकरणाला मिळू शकते कलाटणीहे निष्कर्ष केंद्रीय आरोग्य खात्याने स्वीकारल्यास या दोन्ही लसींच्या मिश्रणातून नवी लस तयार होऊन शकते. पण तसा कोणताही निर्णय केंद्राने अद्याप घेतलेला नाही. लसींचे मिश्रणाच्या अभ्यासास औषध महानियंत्रकांनी गेल्या महिन्यात संमती दिली. वेल्लोरच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजने ही परवानगी मागितली होती.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या