शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

मिशन २०२४: भाजप प्रादेशिक पक्षांशी युती करणार, आंध्र, बिहार, तामिळनाडू आणि हरयाणामध्ये रणनीतीत बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 06:42 IST

BJP News: भाजपचे नेतृत्व प्रादेशिक पक्षांबाबत आपली रणनीती नव्याने ठरवीत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवून प्रादेशिक पक्षांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

- हरीश गुप्तानवी दिल्ली :  भाजपचे नेतृत्व प्रादेशिक पक्षांबाबत आपली रणनीती नव्याने ठरवीत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवून प्रादेशिक पक्षांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा हे ज्या चंद्राबाबू नायडूंवर आरोप करत होते की, ते घराणेशाहीचे राजकारण करतात आणि भ्रष्ट आहेत. पण, आता त्यांनाच तेलुगू देसमच्या चंद्राबाबू यांच्यासोबत युती हवी आहे. 

आगामी संभाव्य धोका लक्षात घेता महत्त्वाच्या आंध्र प्रदेश, बिहार, तामिळनाडू आणि हरयाणा या राज्यात पक्षाने आपल्या रणनीतीत बदल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नायडूंसोबत एक बैठक झाली आहे. त्यानंतर नायडू यांचा मुलगा नारा लोकेश आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी युतीच्या रूपरेषेवर चर्चा केली. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत तेलुगू देसमने एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. आंध्रमध्ये सत्ताधारी वायएसआरसीपीसोबत युती करण्यासाठी भाजप उत्सुक होता. मात्र, राजकीय अपरिहार्यतेमुळे ते शक्य झाले नाही. तामिळनाडूत ईपीएस आणि ओपीएस गटांना एकत्र आणण्याचाही भाजपचा प्रयत्न आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केरळात बोलताना स्पष्ट केले होते की, सर्व भ्रष्ट विरोधी पक्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपविरुद्ध एकजूट होण्याचा प्रयत्न करत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे केवळ राज्यातच नव्हे तर, बाहेरही भाजपविरुद्ध एक संभाव्य चेहरा आहेत. नितीशकुमार यांनी प्रदेश में दिखा, देश में देखेंगे अशा घोषणा देत आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय अभियानाची सुरुवात केली आहे.   

देवीलाल कुटुंबातील गटांना एकत्र आणणार? हरयाणात देवीलाल यांच्या कुटुंबातील तीन गटांना एकत्र आणण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. हरयाणातील दोन गट दुष्यंत चौटाला यांच्या नेतृत्वातील जेजेपी आणि रणजित कुमार हे आधीच एनडीएचा भाग आहेत. मात्र, भाजपची अशी इच्छा आहे की, अभय चौटाला यांच्या नेतृत्वातील आयएनएलडीने सोबत यावे. जेणेकरून, भूपिंदर सिंग हुड्डा यांच्या नेतृत्वातील काँग्रेसशी लढता येईल. तसेच लोजपातील दोन गटांत तडजोड करण्याचाही प्रयत्न सुरू आहे. 

टॅग्स :BJPभाजपाElectionनिवडणूकPoliticsराजकारण