शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 09:13 IST

अहमदाबादमध्ये विमान अपघातात जीव गमावलेल्या पीडितांविषयी सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जात आहे.

Ahmedabad Plane Crash: गुरुवारी अहमदाबादमध्ये झालेल्या २७० जणांच्या मृत्यूनंतर देशभरातली पीडित कुटुंबे भीषण अपघातातून सावरण्यासाठी संघर्ष करत आहेत. दुसरीकडे मात्र सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरमुळे पीडित कुटुंबियांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काही इन्फ्लुएन्सरने हे या अपघातात जीव गमावलेल्या लोकांविषयी खोटी माहिती परसवण्याचे काम करत आहेत. या अपघातात पती प्रतीक जोशी आणि तीन मुलांसह मृत्युमुखी पडलेल्या कोमी व्यास यांचाभाऊ कुलदीप भट्ट यांनी सोशल मीडियावर या दुर्घटनेचा गैरवापर करण्याविरुद्ध तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत असे न करण्याची विनंती केली आहे.

अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या फ्लाईट AI171 च्या दुर्दैवी अपघातात विमानातील २४१ जणांचा मृत्यू झाला होता. लंडनला जाणारे विमान उड्डाणानंतर काही वेळातच मेघानीनगर परिसरातील एका मेडिकल हॉस्टेल आणि कॅन्टीन कॉम्प्लेक्सवर कोसळले. यामध्ये कोमी व्यास, तिचे पती प्रतीक जोशी आणि त्यांची मुले प्रद्युत, नकुल आणि मिराया होते. कुलदीप भट्ट यांनी अपघातानंतर आमचे संपूर्ण कुटुंब धक्क्यातून आणि मानसिक तणावातून जात असल्याचे सांगितले. काही लोक आमच्या कुटुंबाचे खोटे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून चुकीची माहिती पसरवत आहेत, त्यामुळे आम्हाला समजून घ्या आणि अफवा पसरवू नका, अशी विनंती कुलदीप भट्ट यांनी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरना केली आहे.

"सर्वात मोठी समस्या अशी आहे की आमचे कुटुंब आणि इतर २७० जणांचे कुटुंब मानसिक आघातातून जात आहेत. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर त्यांचे व्ह्यूज, लाईक्स आणि फॉलोअर्स वाढवण्याच्या प्रयत्नात, क्रॅश व्हिडिओंचा गैरवापर करत आहेत, बनावट दृश्ये पोस्ट करत आहेत. जेव्हा कोमी आणि इतर लोक फ्लाइटमधून जात होते, तेव्हा त्यांनी एक सेल्फी काढला आणि आमच्या कुटुंबाच्या ग्रुपमध्ये पोस्ट केला. आता तो फोटो व्हायरल झाला आहे. लोक त्या फोटोवरून व्हिडिओ तयार करत आहेत. असाच एक व्हिडिओ संपूर्ण भारतात व्हायरल झाला आहे. तो एआय-जनरेटेड आहे. त्या फोटोवरु बनावट व्हिडिओ बनवण्यात आला आहे," असं कुलदीप भट म्हणाले.

प्रदीप यांच्या मुलीचा फोटोही सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने व्हायरल केला जात आहे. त्यावरूनही भट्ट यांनी नाराजी व्यक्त केली. "कालपासून सोशल मीडियावर एक फोटो फिरत आहे ज्याचा आम्हाला खूप त्रास होतोय. ती मुलगी मिराया आहे, खूप सुंदर मुलगी होती. आता आम्हाला डीएनए नमुन्याबद्दल काहीच माहिती नाही. ते जुळत नाहीयेत. पण सोशल मीडियावर लोक तिचा मृतदेह जळाल्याचा दावा करत आहेत. तिच्या अंत्यसंस्काराचे व्हिडिओही फिरत आहेत," असं कुलदीप भट यांनी सांगितले.

"कोमीच्या फोटोंचा गैरवापर केला जात आहे. तिच्या नावाने फेक अकाउंट बनवले गेले आहेत. मी सर्व सोशल मीडिया इन्फ्लुएंसरना विनंती करतो की कृपया ते थांबवा. तुमचे लाईक्स आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी तुम्ही आम्हाला इतका मानसिक त्रास का देत आहात?" असाही सवाल भट्ट यांनी केला. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडिया