शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया, राहुल, प्रियांका गांधींच्या राजीनाम्याची चर्चा; पण काँग्रेसकडून इन्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 21:49 IST

काँग्रेस कार्यकारिणीची उद्या बैठक; निवडणुकांतील पराभवानंतर नाराज नेते आक्रमक

- शीलेश शर्मा

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दणदणीत पराभव झाल्यानंतर आज, रविवारी होत असलेल्या पक्षकार्यकारिणीच्या बैठकीत विद्यमान नेतृत्वावर घणाघाती टीका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीच्या प्रारंभीच गांधी परिवारातील राहुल, सोनिया व प्रियांका गांधी यांनी आपापल्या पदांचे राजीनामे देण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. सूत्रांनी सांगितले की, काँग्रेसमध्ये तातडीने संघटनात्मक निवडणुका घेण्याचा आग्रह विद्यमान पक्षाध्यक्ष सोनिया गांधी कार्यकारिणीच्या बैठकीत धरणार आहेत. या निवडणुकांमुळे काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष व नवी कार्यकारिणी अशा दोन्ही गोष्टी मिळतील. काँग्रेस कार्यकारिणीच्या आज होणाऱ्या बैठकीत कोणते मुद्दे उपस्थित करायचे याची रणनीती त्या पक्षातील २३ नाराज नेत्यांनी ठरविली आहे. यासंदर्भात काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी नाराज नेत्यांची एक बैठकही झाली. राहुल गांधी यांच्यावर हे नेते घणाघाती टीका करणार आहेत.काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की, अशोक गेहलोत किंवा सचिन पायलट यापैकी एका नेत्याची काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करावी असा पक्षात मतप्रवाह आहे. अशोक गेहलोत अध्यक्ष झाल्यास सचिन पायलट यांच्यावर राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविली जाऊ शकते. पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्या राजीनाम्याची मागणीही काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत काही नेते करणार आहेत. पंजाबमध्ये काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी सक्षम नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देणे आवश्यक आहे. त्यासाठी सुनील जाखड यांच्या नावाला अनेक काँग्रेस नेत्यांचा होकार असल्याचे समजते. उत्तराखंड, गोवा, मणिपूरमध्येही काँग्रेसच्या नेतृत्वात बदल करावा, अशी मागणी आनंद शर्मा यांच्यासहित काही नाराज नेते पक्षकार्यकारिणीच्या बैठकीत करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.काँग्रेसने मात्र सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधींच्या राजीनाम्याचे वृत्त फेटाळले आहे. राजीनाम्याच्या वृत्ताला कोणताही आधार नाही. ते पूर्णपूर्ण चुकीचे असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसश्रेष्ठींशी तर पृथ्वीराज चव्हाणांची बंडखोर नेत्यांशी चर्चामहाराष्ट्राचे महसूल मंत्री व काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते बाळासाहेब थोरात व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शनिवारी दिल्लीत दाखल झाले. बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत, तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी असंतुष्ट गटाचे सदस्य म्हणून बंडखोर नेत्यांशी चर्चा केली. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाचा परिणाम महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेवर होणार नसल्याचे थोरात यांनी पत्रकारांना सांगितले. त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्याशी चर्चा केली. परंतु, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीराहुल गांधी यांची शनिवारी भेट होऊ शकली नाही.

विधानसभा अध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत चर्चा करणारमहाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांची निवड पुढील आठवड्यात होणार आहे. या पदासाठी उत्सुक असलेल्या नावांबाबत चर्चा करण्यासाठी आपण दिल्लीत आल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेस पक्षश्रेष्ठींना भेटण्याची शक्यता नसून, ते पक्षातील नाराज नेत्यांशी चर्चा करीत आहेत. काँग्रेसमधील असंतुष्टातील गटाला महाराष्ट्रातून चव्हाण यांच्याकडून पाठबळ मिळणार आहे.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस