शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
3
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
4
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
5
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
6
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
7
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
8
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
9
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
10
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
11
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
12
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
13
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
14
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
15
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
16
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
17
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
18
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
19
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
20
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!

Mirabai Chanu : देशाला रौप्यपदक देणाऱ्या मीराबाईचा भाऊही सैन्यात करतोय देशसेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 14:27 IST

Mirabai Chanu : मीराबाई चानूचा जन्म मणिपूरच्या खेड्यातील. राजधानी इम्फाळपासून २५ किमी दूर तिचे गाव. ‘लाकूड’ हे घरातलं मुख्य इंधन. मीराबाई लाकडे आणण्यासाठी भावंडांबरोबर जायची.

ठळक मुद्देसाईखोम सनाटोंबा मैतई हे मीराबाईचे ज्येष्ठ बंधु आहेत. मीराबाईचा ऑलिंपक स्पर्धेतील खेळ पाहण्यासाठी त्यांनी 24 जुलैसाठी अगोदर सुट्टी घेतली होती. मैतई हे सध्या बंगळुरूत राहत असून ते भारतीय सैन्य दलात देशसेवा करत आहेत. 

नवी दिल्ली - टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदकाची कमाई केली आणि मणिपूरची ही कन्या देशाची नायक ठरली. भारतात दाखल होताच तिचे जंगी स्वागत झाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अनेक राजकारण्यांची सोशल मीडियावर तिचे अभिनंदन केले. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी तर शाही सोहळ्याचे आयोजन करून मीराबाईचा सत्कार केला. देशासाठी पदक जिंकणाऱ्या मीराबाईचे मोठे बंधु हेही सैन्य दलातून देशसेवा करत आहेत. 

मीराबाई चानूचा जन्म मणिपूरच्या खेड्यातील. राजधानी इम्फाळपासून २५ किमी दूर तिचे गाव. ‘लाकूड’ हे घरातलं मुख्य इंधन. मीराबाई लाकडे आणण्यासाठी भावंडांबरोबर जायची. सहा भावंडांतील ती सर्वात लहान. पण येताना सर्वात जास्त लाकडे ती घेऊन यायची. तिने आणलेली मोळी तिच्या मोठ्या भावांनाही उचलता येत नसे. त्यातीलच, साईखोम सनाटोंबा मैतई हे मीराबाईचे ज्येष्ठ बंधु आहेत. मीराबाईचा ऑलिंपक स्पर्धेतील खेळ पाहण्यासाठी त्यांनी 24 जुलैसाठी अगोदर सुट्टी घेतली होती. मैतई हे सध्या बंगळुरूत राहत असून ते भारतीय सैन्य दलात देशसेवा करत आहेत. 

मैतई यांनीच मीराबाईला वेटलिफ्टींगमध्ये करिअर करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळेच, तिचा ऑलिंपकमधील सामना पाहण्यासाठी ते अतिशय उत्साही होते. कारण, यापूर्वी रिओ ऑलिंपिकमध्ये मीराबाईला आलेलं अपयश हेही आहे. या अपयशातून अतिशय धैर्याने, संयमाने आणि कष्टाने मीराबाईने रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. मैतई यांनीही 2000-2006 या कालावधीत फुटबॉल खेळला आहे. मात्र, घरची कौटुंबिक परिस्थिती लक्षात घेऊन वयाच्या 17 व्या वर्षीच ते भारतीय सैन्य दलात भरती झाले. त्यामुळे, आपले अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी मीराबाईला प्रोत्साहन दिले, वेळोवेळी मदत केली. 

मीराबाई बनल्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक

मणिपूर राज्य सरकारनं मीराबाईला १ कोटी अन् अतिरिक्त पोलीस अधीक्षक (क्रीडा) या पदावर नियुक्ती केल्याची घोषणा केली. इम्फाळ येथे परतताच तिच्या स्वागताला गाड्यांचा मोठाचा मोठा ताफाच होता. पण, एवढं सगळं वैभव मिळूनही मीराबाईचे पाय आजही जमिनीवर आहेत. त्याची साक्ष देणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, रौप्य पदक जिंकून मायदेशी परतल्यानंतर आपल्या भावासोबत त्या जेवण करताना दिसत आहेत.   

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Mirabai Chanuमीराबाई चानूIndian Armyभारतीय जवान