शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अल्पसंख्य मेडिकल, डेंटल कॉलेजांनाही ‘नीट’ सक्तीची

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 05:21 IST

पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे सर्व प्रवेश केंद्र सरकारतर्फे घेतल्या जाणा-या ‘राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षे’तील (नीट) गुणवत्तेनुसारच देणे बंधनकारक आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला.

नवी दिल्ली : धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्य संस्थांतर्फे चालविल्या जाणाऱ्या वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय महाविद्यालयांनाही त्यांचे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे सर्व प्रवेश केंद्र सरकारतर्फे घेतल्या जाणा-या ‘राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षे’तील (नीट) गुणवत्तेनुसारच देणे बंधनकारक आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला.देशातील वैद्यकीय व दंतवैद्यकीय महाविद्यालयांमधील सर्व प्रवेशांसाठी ‘नीट’ ही एकच सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात अशी अनुदानित किंवा विनाअनुदानित महाविद्यालये चालविणाºया देशभरातील अल्पसंख्य संस्थांनी सन २०१२ व २०१३ मध्ये विविध उच्च न्यायालयांमध्ये सुमारे १०० याचिका केल्या होत्या. त्या सर्व याचिका आपल्याकडे वर्ग करून घेऊन सर्वोच्च न्यायालयाने त्यांची सुनावणी केली. गेल्या जानेवारीत राखून ठेवलेला निकाल न्या. अरुण मिश्रा, न्या. विनित शरण व न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठाने जाहीर केला. याच याचिकांपैकी वेल्लोरच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने जुलै २०१३ मध्ये ‘नीट’ परीक्षा घटनाबाह्य ठरवून रद्द केली होती. मात्र, नंतर मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने केलेली फेरविचार याचिका मंजूर करून तो निकाल रद्द केला गेला.आधी मेडिकल व डेन्टल कौन्सिलने त्यांच्या नियमावलींत बदल करून प्रवेशांसाठी ‘नीट’ परीक्षा सक्तीची केली होती. नंतर केंद्र सरकारने या दोन्ही नियामक संस्थांच्या मूळ कायद्यांमध्येच सुधारणा करून ‘नीट’ची तरतूद केली. त्यामुळे आता झालेल्या निकालाने या सुधारित कायद्याची घटनात्मक वैधताही सिद्ध झाली. अल्पसंख्य संस्थांना राज्यघटनेने स्वत:च्या शिक्षण संस्था स्थापन करून त्यांचे प्रशासन स्वत: आपल्या पसंतीनुसार करण्याचा मूलभूत हक्क दिला आहे. ‘नीट’नुसारच प्रवेश देण्याची सक्ती हा या अधिकारावर तसेच एकूणच पसंतीचा उद्योग-व्यवसाय करण्याच्या हक्कावर घाला आहे, असा याचिकाकर्त्या कॉलेजांचा मुख्य मुद्दा होता. तो फेटाळताना न्यायालयाने यापूर्वी दिल्या गेलेल्या डझनभर निकालांचे दाखले देत म्हटले की, मुळात शिक्षण हा धंदा किंवा व्यवसाय नाही. ते सेवाभावी वृत्तीने केले जाणारे कार्य आहे.खासकरून वैद्यकीय शिक्षण दर्जेदार असणे व त्यातील प्रवेश फक्त गुणवत्तेवर व पारदर्शी पद्धतीने दिले जाणे हा एकूणच आरोग्य व्यवस्था उत्तम असण्याच्या दृष्टीने व्यापक देशहिताचा विषय आहे.>सरकार रास्त मर्यादा आणू शकतेअल्पसंख्य संस्थांचा मूलभूत हक्क या देशहिताहून गौण आहे. शिवाय त्यांचा हक्क हा अनिर्बंध नाही. त्यांच्या या हक्कावर सरकार रास्त मर्यादा आणू शकते. वैद्यकीय आणि एकूणच व्यावसायिक शिक्षणात सध्या जी बजबजपुरी माजली आहे तिला परिणामकारकपणे आळा घालण्यासाठी ‘नीट’ परीक्षेचे हे बंधन घातले असल्याने ते अजिबात अवास्तव ठरत नाही.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्या