नवी दिल्ली : दिल्लीच्या रोहिणी भागात १४ वर्षांच्या मुलीवरील बलात्काराच्या आरोपावरून पोलिसांनी तिघांना अटक केली. या बलात्काराचे व्हिडीओ फिरू लागताच पीडितेच्या आईला तिच्या शेजाऱ्याने हा प्रकार सांगितला. नंतर तिने पोलिसांकडे तशी तक्रार दिली.अत्याचार दोन आठवड्यांपूर्वी मंगोलपुरी वसाहतीत घडला. मुख्य आरोपी मजूर असून, तो पीडितेचा शेजारी आहे. त्याने तिला त्याच्या घरी आमिष दाखवून नेले. तेथे आधीच त्याचे दोन मित्र होते. त्याने तिच्यावर बलात्कार केला व त्याच्या मित्रांनी मोबाइलवर त्याचे चित्रीकरण केले. आरोपीने नंतर तिला ब्लॅकमेल करणे सुरू केले. हे व्हिडीओ इंटरनेट व व्हॉट्सअॅपवर टाकण्याची धमकी दिली. हा प्रकार शेजाºयाकडून आईला समजताच मुलीने सगळे काही सांगितले. मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.दोन महिने बलात्कारमुजफ्फरनगर : घराच्या तळघरात जवळपास दोन महिने डांबून ठेवून दोन जणांनी २३ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडितेने तक्रारीत येथील सिविल लाइन्स भागात आपल्यालाा दोन महिने डांबून एक इसम व त्याच्या चुलत्याने बलात्कार केल्याचे सांगितले आहे. तेथून महिलेने १ फेब्रुवारीला स्वत:ची कशीबशी सुटका करून घेतली. आरोपी व त्याच्या चुलत्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. एकाला अटक झाली असून, फरार चुलत्याचा शोध घेत आहेत.
दिल्लीत अल्पवयीनवर बलात्कार, तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 01:36 IST