शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

धक्कादायक! 8 वर्षांच्या मुलाकडून 18 महिन्यांच्या बाळाची हत्या, मृतदेह सापडला नाल्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 13:31 IST

देशाच्या राजधानीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्लीः देशाच्या राजधानीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून वाद झाल्यानं एका आठ वर्षांच्या मुलानं कथित स्वरूपात दीड वर्षांच्या मुलाची हत्या केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, काही दिवसांपूर्वीच दीड वर्षाच्या मुलाच्या बहिणीनं आरोपी मुलाला धक्का दिला होता. त्यामुळे तो आठ वर्षांचा मुलगा जमिनीवर कोसळला होता. त्यानंतर त्याच्या डोक्याला सूज आली. तो राग त्या मुलानं मनात ठेवला आणि त्या दीड वर्षाच्या बाळाची हत्या केली.दक्षिण दिल्लीतल्या फतेहपूर बेरीमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. दीड वर्षाच्या मुलाच्या बहिणीनं त्या आठ वर्षांच्या मुलाला धक्का मारल्याचा राग धरून त्यानं त्या दीड वर्षाच्या बाळाचं आयुष्य संपवलं. पोलीस उपायुक्त विजयकुमार यांच्या मते, शनिवारी सकाळी मुलगा बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. प्राथमिक चौकशीत दीड वर्षाचा मुलगा गायब असल्याचं समजलं. मांडी गावातल्या आपल्या घराच्या गच्चीवर शुक्रवारी रात्री ते दीड वर्षाचं बाळ आई आणि बहिणीबरोबर झोपलं होतं. जवळपास पहाटे चार वाजता ते बाळ गायब झालं. त्याच दरम्यान भाड्यानं राहणाऱ्या कुटुंबातील तो आठ वर्षांचा मुलगाही बेपत्ता होता. त्यानंतर त्या दीड वर्षाच्या बाळाचा शोध घेतला असता मृतदेह घराच्या बाहेरील नाल्यामध्ये सापडला.पोलिसांच्या माहितीनुसार, दीड वर्षाच्या बाळाचा डावा डोळा, पोट आणि पायावर जखमा होत्या. त्या बाळाच्या कानातून रक्तस्राव होत होता. या प्रकरणात फतेहपूर बेरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपी मुलाला शनिवारी सकाळी ताब्यात घेण्यात आलं. त्याला आता बाल न्यायालयात हजर केलं जाणार आहे.