नाशिक : पंचवटीतील आदर्शनगरमध्ये राहणार्या अल्पवयीन मुलीने मंगळवारी (दि़१९) रात्री नऊ वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्त्या केली. आत्महत्त्या केलेल्या मुलीचे नाव साक्षी राजेंद्र धात्रक (१३, रा. बागुल चाळ) असे आहे. तिच्या कुटुंबीयांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्यांनी मयत घोषित केले. दरम्यान, तिच्या आत्महत्त्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)
पंचवटीत अल्पवयीन मुलीची आत्महत्त्या
By admin | Updated: July 21, 2016 22:10 IST