निरीक्षणगृहातील अल्पवयीन मुलगा बेपत्ता
By admin | Updated: November 27, 2015 01:34 IST
नाशिक : उंटवाडी येथील बालनिरीक्षण गृहातील दीपक विनोद जयराम हा पंधरा वर्षीय मुलगा १२ एप्रिल २०१४ पासून बेपत्ता झाला आहे़ सकाळी ११ वाजेच्या सुमारास शाळेत जातो असे सांगून गेला तो परत आलाच नाही़ बेपत्ता दीपक शरीराने सुदृढ, रंग निमगोरा, चेहरा गोल, नाक सरळ, डोळे काळे, डोक्याचे केस मोठे असून, त्याने अंगात चौकटीचा शर्ट व काळ्या रंगाची फूल पॅन्ट घातली आहे़ त्याचे कपाळ व पायावर जखमेची खूण असून, निरीक्षकगृहाचे काळजीवाहक पांडुरंग खैरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, अशा वर्णनाचा मुलगा कुणाला आढळल्यास सरकारवाडा पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)