शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या, मास्क न घातल्यास भरावा लागेल 500 रुपये दंड, रेल्वे मंत्रालयाने कडक केले नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 19:15 IST

रेल्वे मंत्रालयाने आपल्या कोविड-19 नियमावलीला पुढील आदेशापर्यंत वाढवले आहे.

नवी दिल्ली: दसरा आणि दिवाळी या काळात सार्वजनिक ठिकाणी किंवा प्रवास करणाऱ्यांची खूप गर्दी होते. याच पार्श्वभूमीवर रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिंसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने कोविड-19 नियमावली सहा महिने किंवा पुढील निर्देशांपर्यंत वाढवली आहे. आदेशानुसार, रेल्वे परिसर आणि गाड्यांमध्ये मास्क न घातल्यास 500 रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे.

17 एप्रिल 2021 रोजी भारतीय रेल्वेने स्टेशनवर मास्क घालण्याबाबत विशेष गाइडलाइन्स जारी केल्या होत्या. त्या अधिसूचनेची वैधता या महिन्यात 16 ऑक्टोबर रोजी संपणार होती. पण, आता दसरा-दिवळीसारख्या सणांना होणाऱ्या गर्दीमुळे 17 एप्रिल रोजी जारी केलेल्या अधिसूचनेचा संदर्भ देत रेल्वेने जारी केलेल्या नवीन अधिसूचनेनुसार, गाइडलाइन्स 16 एप्रिल 2022 पर्यंत किंवा पुढील निर्देशांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासांत 22 हजार रुग्णांची वाढ

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये देशात सुमारे 22 हजार रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात 56 टक्के कोविड प्रकरणे केरळमधून नोंदवण्यात आली होती. अद्यापही अशी 5 राज्ये आहेत जिथे अजूनही 10 हजारांहून अधिक सक्रिय प्रकरणे आहेत. केरळमध्ये सुमारे 1,22,000 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात जवळपास 36,000 आहेत. तामिळनाडू, मिझोराम आणि कर्नाटकमध्येही सक्रिय रुग्णांची संख्या जास्त आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्या