शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

Coal Crisis: ...तर वीज थेट परत घेतली जाणार; कोळसा संकटात महत्त्वाचा निर्णय, आदेश निघाले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 12:32 PM

Coal Crisis: देशावर ४० वर्षांतलं सर्वात मोठं संकट; दिवाळी अंधारात जाण्याची भीती

नवी दिल्ली: कोळसा टंचाईमुळे देशावर मोठं संकट निर्माण झालं आहे. प्रकाशाचा सण म्हणून ओळखली जाणारी दिवाळी यंदा अंधारात बुडून जाईल अशी शक्यता वाटू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर ऊर्जा मंत्रालयानं केंद्रीय वीज निर्मिती केंद्रांवरून पुरवण्यात येणाऱ्या वीजेच्या वापराबद्दल नियमावली जारी केली आहे. राज्यांना दिली जाणारी वीज त्यांनी ग्राहकांसाठी वापरावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत. ज्या राज्यांकडे अतिरिक्त वीज उपलब्ध आहे, त्यांनी याबद्दलची माहिती द्यावी, जेणेकरून त्या विजेचा वापर गरजू राज्यांमध्ये करता येईल, असं आवाहन करण्यात आलं आहे.

एखादं राज्य पॉवर एक्स्चेंजमध्ये विजेची विक्री करताना आढळल्यास, पुरवण्यात येणाऱ्या विजेचं नियोजन न करताना दिसल्यास त्यांना होणारा वीजपुरवठा कमी केला जाऊ शकतो किंवा वीज परत घेतली जाऊ शकते. ही वीज गरजू राज्यांना पुरवली जाईल. विजेचं नुकसान कमी व्हावी वितरक कंपन्यांना (डिस्कॉम) ऊर्जा लेखांकन अत्यावश्यक केलं आहे. त्यासाठी अधिसूचना काढण्यात आली आहे. 

अधिसूचनेत नेमकं काय?प्रमाणित ऊर्जा व्यवस्थापकाच्या माध्यमातून डिस्कॉमला ६० दिवसांत तिमाही ऊर्जा लेखांकन करावं लागेल. एका स्वतंत्र मान्यता प्राप्त ऊर्जा लेखा परिक्षकाद्वारा वार्षिक ऊर्जा लेखा परीक्षादेखील होईल. हे दोन्ही अहवाल सार्वजनिकरित्या प्रकाशित करावे लागतील. यामुळे विजेचं नुकसान, चोरी रोखण्यास मदत होईल.

१३५ पैकी ११० प्रकल्पात कोळसा संकटसेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटीच्या ७ ऑक्टोबरच्या रिपोर्टनुसार, देशात १३५ पैकी ११० प्रकल्पात कोळसा संकट(Coal Shortage) आलं आहे. १६ प्रकल्पात तर एक दिवसाचा कोळसा साठाही शिल्लक नाही. ३० प्रकल्पांकडे १ दिवसाचा कोळसा साठा आहे. तर १८ प्रकल्पात केवळ २ दिवस पुरेल इतका साठा शिल्लक आहे. म्हणजे परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. यात हरियाणा आणि महाराष्ट्र येथे ३ प्रकल्प आहेत. ज्यात एक दिवसाचाही कोळसा शिल्लक नाही. याचसह पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, बिहार येथे एक एक प्रकल्प आहेत जेथे १ दिवसाचा साठा आहे.

वीज संकटाचा धोका केवळ भारत नव्हे तर चीन, युरोप आणि अमेरिका इथंही निर्माण झालं आहे. त्यात ऑक्टोबर महिन्यात वीजेची मागणी वाढली आहे. दिल्ली, पंजाब, केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक सरकारने बिघडत्या परिस्थितीवर केंद्राकडे बोट दाखवलं आहे. केरळ, महाराष्ट्रच्या नागरिकांना वीज काळजीपूर्वक वापरण्याचं आवाहन केले जात आहे. भारत वीज संकटाच्या दिशेने जात आहे का? चीनप्रमाणे देशातील अनेक भागात अंधार येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.यंदाची दिवाळी अंधारात जाणार? भारतासह चीन, अमेरिका आणि युरोपवर संकट कोसळणार

 

टॅग्स :Coal Shortageकोळसा संकटelectricityवीज