शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 16:27 IST

Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताच्या घटनेनं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. या अपघातात आतापर्यंत २७५ ...

Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताच्या घटनेनं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. या अपघातात आतापर्यंत २७५ जणांना जीव गमवावा लागला. यापैकी २४१ हे एअर इंडियाच्या विमानातील प्रवासी होती. हे सर्वजण लंडन येथे जात होते. मात्र उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे विमान कोसळलं आणि मोठी जीवितहानी झाली. या भीषण दुर्घटनेवर जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आता नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने या संपूर्ण घटनेबाबत माहिती दिली आहे. पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोल विभागाला माहिती दिली होती पण त्यांचा नंतर संपर्क होऊ शकला नाही असं नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव समीर कुमार सिन्हा यांनी सांगितले.

अहमदाबादमध्येएअर इंडियाचं अहमदाबाद-लंडन एआय-१७१ हे ड्रिमलायनर विमान गुरुवारी अहमदाबाद विमानतळाजवळ कोसळले. एअर इंडियाचं ड्रीमलायनर विमान विमानतळापासून जवळच असलेल्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासी क्वार्टर व मेस हॉलमध्ये कोसळलं. या दुर्घटनेचे व्हिडीओदेखील व्हायरल झाले आहेत. त्यानंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने या अपघाताबाबत माहिती दिली आहे. अपघातापूर्वी विमानाने पॅरिसहून दिल्ली आणि नंतर दिल्लीहून अहमदाबादला कोणत्याही अडचणीशिवाय प्रवास केला होता, असं सरकारने शनिवारी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

"विमानाने दुपारी १:३९ वाजता उड्डाण केले. सुमारे ६५० फूट उंचीवर पोहोचल्यानंतर, त्याची उंची कमी होऊ लागली. वैमानिकाने दुपारी १:३९ वाजता एटीसीला  आपत्कालीन परिस्थितीची माहिती दिली. एटीसीच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांनी विमानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. १ मिनिटानंतर, विमान विमानतळापासून २ किमी अंतरावर असलेल्या मेघानी नगर भागात कोसळले. या अपघातापूर्वी त्या विमानाने पॅरिसहून दिल्ली आणि दिल्लीहून अहमदाबादला कोणत्याही अडचणीशिवाय उड्डाण पूर्ण केले होते. अपघातामुळे, विमानतळ दुपारी २.३० वाजता बंद करण्यात आले. सर्व प्रोटोकॉल पूर्ण केल्यानंतर ते संध्याकाळी ५ वाजता उघडण्यात आले," असं मंत्रालयाचे सचिव समीर कुमार सिन्हा म्हणाले.

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू किंजरापु यांनीही या घटनेबाबत दुःख व्यक्त केले. "गेले दोन दिवस खूप कठीण गेले. अहमदाबाद विमानतळाजवळ झालेल्या अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. या अपघातात ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याबद्दल माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. काय करावे, कोणती मदत करावी हे पाहण्यासाठी मी स्वतः घटनास्थळी गेलो होतो आणि गुजरात सरकारचाही असाच दृष्टिकोन होता. भारत सरकार आणि मंत्रालयातील इतरांचाही असाच दृष्टिकोन होता. जेव्हा आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा आम्हाला दिसले की सर्व संबंधित विभागांची पथके काम करत होती, शक्य तितके बचाव करण्याचा प्रयत्न करत होते, आग विझवण्याचा आणि ढिगारा काढण्याचा प्रयत्न करत होते, जेणेकरून मृतदेह लवकरात लवकर रुग्णालयात पाठवता येतील, असं राम मोहन नायडू किंजरापु म्हणाले. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडिया