शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री स्मृती इराणी, नक्वी माटुंग्याच्या हॉटेलमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 05:44 IST

मोदी यांचा जनतेत जाण्याचा आदेश

ठळक मुद्देमहिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी आणि अल्पसंख्याक खात्याचे मंत्री मुख्तार अब्बास नकवी आपापल्या मंत्रालयाच्या कार्यक्रमानिमित्त मुंबईत गेले होते.

नितीन अग्रवालनवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारमधील मंत्री गेल्या काही दिवसांत सामान्य नागरिकांप्रमाणे लोकांमध्ये वावरताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या सांगण्यावरून मंत्री जनभावना समजून घेण्यासाठी त्यांच्यात थेट सहभागी होत आहेत. याची सुरुवात आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी केली. त्यानंतर सोमवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि मुख्तार अब्बास नकवी हे मुंबईत सामान्य व्यक्तीसारखे माटुंगा येथील कॅफे म्हैसूर येथे डोसा खाण्याचा आनंद घेताना दिसले.

महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी आणि अल्पसंख्याक खात्याचे मंत्री मुख्तार अब्बास नकवी आपापल्या मंत्रालयाच्या कार्यक्रमानिमित्त मुंबईत गेले होते. मोदी यांनी सगळ्या मंत्र्यांना जनतेत जाऊन त्यांचे मन समजून घेण्याचा सल्ला दिला आहे. या आधी आरोग्य मंत्री मनसुख मांडविया हे सामान्य माणसाप्रमाणे केंद्र सरकारच्या आरोग्य सेवांचा आढावा घेण्यासाठी दिल्लीतील सीजीएचएस डिस्पेंसरीत गेले होते. तेथे त्यांनी आपली बनावट ओळख सांगून आरोग्याच्या अडचणी सांगितल्या व उपचार करून घेतले. त्यानंतर या डॉक्टरला कर्तव्यनिष्ठेबद्दल मंत्रालयात मांडविया यांनी बोलावून प्रशंसा केली. स्मृती इराणी या आधी त्यांचा मतदारसंघ अमेठीत लस्सी पिताना दिसल्या होत्या. नुकत्याच मोदी सरकारमधील सगळ्या मंत्र्यांनी देशभर लोकांमध्ये जाऊन जनआशीर्वाद यात्रा काढली होती. देशभरात २४ हजार किलोमीटरचे अंतर कापून पक्षाने १४ दिवसांत पाच हजारांपेक्षा जास्त कार्यक्रम आयोजित केले, असा दावा भाजपने केला आहे.

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीNarendra Modiनरेंद्र मोदी