शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भर बाजारात भाजपा मंत्र्यांनी महिलेच्या हाताने लगावून घेतली श्रीमुखात; नेमकं काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 20:59 IST

शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारमधील या मंत्र्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये एक अजब घटना समोर आली आहे. भाजी मार्केटमध्ये कारवाई केल्यानंतर येथील विक्रेत्यांनी मंत्र्याविरोधात आपला संताप व्यक्त केला आहे. यावेळी ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांच्यावरही महिलेने राग काढला. दुकान हटवण्यासाठी मारहाण केल्याचा आरोपही महिलेने यावेळी केला. शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारमधील या मंत्र्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मंत्र्यांनी महिलेच्या हाताने स्वत:च्या श्रीमुखात लगावून घेतली आहे.

भाजी मार्केटमधील महिलेशी तोमर यांनी वेगळ्याच शैलीत संवाद साधला. मिळालेल्या माहितीनुसार, हजीरा येथील भाजी मार्केटमधील महिला बबीना यांचं दुकान हटविण्यात आलं होतं, हे भाजी मार्केट दुसऱ्या एका मैदानात शिफ्ट करण्यात आलं आहे. त्यावेळी येथील दुकानदारांनी संताप व्यक्त केला होता. बबीना यांनी देखील तोमर यांच्यासमोर आपला संताप व्यक्त केला आहे. या दुकानावरचं त्यांचं पोट चालतं. पण प्रशासनाने मारहाण करून ते हटल्याचं सांगितलं. 

"मी तुझा मुलगा आहे, आधी तू मला मारून घे मग मी तुझं म्हणणं ऐकेन"

महिला नाराज झालेली पाहून "मी तुझा मुलगा आहे. आधी तू मला मारून घे मग मी तुझं म्हणणं ऐकेन" असं म्हणत मंत्र्यांनी महिलेचे हात घेऊन स्वत:च्या श्रीमुखात लगावून घेतली. यानंतर महिलेचा राग थोडा शांत झाला. त्यांनी महिलेला नमस्कार करत तिची समजूत काढण्याचा प्रयत्न देखील केला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सध्या या व्हिडीओची तुफान चर्चा रंगली असून अनेकांनी या व्हिडीओमध्ये मंत्र्यांची डायलॉगबाजी सुरू असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाPoliticsराजकारण