शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

स्टार्ट अप योजनेला अत्यल्प प्रतिसाद!

By admin | Updated: June 30, 2016 05:18 IST

स्टार्ट अप इंडिया या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली असली तरी सहा महिन्यांत या योजनेला अत्यंत थंड प्रतिसाद मिळाला आहे

सुरेश भटेवरा,

नवी दिल्ली- पंतप्रधान मोदींनी जानेवारीत मोठा गाजावाजा करीत स्टार्ट अप इंडिया या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली असली तरी सहा महिन्यांत या योजनेला अत्यंत थंड प्रतिसाद मिळाला आहे. वाणिज्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार स्टार्ट अप इंडियासाठी नियुक्त आंतर मंत्रालयीन समुहाच्या पहिल्या बैठकीत फक्त एक प्रकल्पाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी मंजुरी मिळाली आणि दुसऱ्या बैठकीत अवघ्या ३ प्रस्तावाची अंतिम मंजुरीसाठी निवड झाली.स्टार्ट अप इंडिया योजनेत सहभागी होणाऱ्या प्रकल्पांना १ एप्रिलपासून अनेकविध लाभ मिळत आहेत. स्टार्ट अप कंपन्यांच्या प्रस्ताव तपासणीसाठी औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागांतर्गत एक आंतर मंत्रालयीन समूह नियुक्त करण्यात आला आहे. करांतून सूट, आयपीआर योजनेचे सारे लाभ, पर्यावरण व श्रम मंत्रालयाच्या ९ विविध कायद्यांतर्गत मिळणाऱ्या साऱ्या मंजुऱ्यांसाठी सेल्फ सर्टिफिकेशन, पहिली तीन वर्षे सरकारी इन्स्पेक्टरमार्फत प्रकल्पाची तपासणी नाही, सरकारी कंपन्यांशी थेट व्यवहार करण्याची मुभा इतकेच नव्हे तर खरेदीचा २0 टक्के भाग स्टार्ट अपकडूनच खरेदी करण्याची सरकारी कंपन्यांना सक्ती असे अनेक लाभ या कंपन्यांना मिळू शकतात. त्याचे मंजुरी प्रमाणपत्र आंतरमंत्रालय समुहाद्वारे प्रदान केले जाते. आंतर मंत्रालयीन समुहाची पहिली बैठक एप्रिल महिन्यात झाली. त्यात ३0 पैकी एका प्रकल्पालाच आयपीआर लाभांची मंजुरी मिळाली, तर दहा प्रकल्प रद्द करण्यात आले. दुसरी बैठक २८ जून रोजी झाली. त्यात १९ प्रस्तावांना बाजूला ठेवून अवघ्या ३ प्रकल्पांना अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आले. देशात सहा महिन्यांत अवघे ४ स्टार्ट अप प्रकल्प सरकारच्या चाचणी परीक्षेत पात्र ठरले, असा याचा अर्थ आहे.>आॅनलाईन अर्ज करणे अधिक फायद्याचे कंपनीच्या आॅनलाईन नोंदणीसह योजनेचे तमाम लाभ मिळवण्यासाठी त्यावर अर्ज दाखल करण्याची सोय आहे. प्रस्ताव आॅनलाईन अर्ज दाखल करताच त्याची नोंदणी प्रक्रिया लगेच केली जाते. मंजुरीपूर्व चाचणीसाठी प्रस्ताव समुहाकडे त्वरित पाठवला जातो. तरीही जूनअखेरची स्थिती पाहता स्टार्ट अप इंडिया योजना अद्याप जाहिराती व कागदपत्रांपुरतीच ठरली आहे.कंपनी अथवा फर्मचा प्रारंभ 05 वर्षांपेक्षा जुना असू नये. आंतर मंत्रालयीन समुहाच्या शर्ती पूर्ण करणाऱ्या मंजूर प्रकल्पांनाच स्टार्ट अप प्रकल्पाचा दर्जा प्राप्त होणार. स्टार्ट अप प्रवर्गात प्रवेश करण्यासाठी २५ कोटींची उलाढाल असलेली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अथवा भागीदारी फर्म असणे आवश्यक. स्टार्ट अप प्रकल्प म्हणजे काय,याची माहिती सरकारने एप्रिलापासून वेब पोर्टल व मोबाईल अ‍ॅपद्वारे देणे सुरू केले आहे.