शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोदी आणि योगी कायम राहणार नाहीत, नंतर तुम्हाला कोण वाचवणार?; ओवेसींची पोलिसांना धमकी आणि नंतर स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 11:50 IST

Asaduddin Owaisi : ओवेसींच्या भाषणाचा एक व्हिडीओ होतोय व्हायरल.

एमआयएमचे प्रमुख (AIMIM) असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन आता अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ओवेसी यांनी त्यावर स्पष्टीकरण देत त्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

"तुम्ही लक्षात ठेवा. काय योगी मुख्यमंत्री राहणार नाहीत, मोदी कायम पंतप्रधान राहणार नाही. प्रत्येक मुस्लीम व्यक्ती सध्या शांत आहे, परंतु विसरणार नाही. आम्ही लक्षात ठेवू... परिस्थिती बदलेल. जेव्हा योगी मठात जातील, मोदी हिमालयात जातील, तेव्हा तुम्हाला वाचवायला कोण येईल," असं ओवेसी म्हणताना दिसत असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.ओवेसींचं स्पष्टीकरणओवेसी यांनी हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी ट्विटरद्वारे यावर स्पष्टीकरण दिलं. "उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचारादरम्यान करण्यात आलेलं वक्तव्य हे पोलिसांना दिलेली धमकी नव्हती. हरिद्वारमधील माझ्या भाषणावरुन लक्ष विचलित करण्यासाठी माझ्या कानपूरमधील भाषणाची एका मिनिटांची क्लिप व्हायरल केली जात आहे," असं ते म्हणाले.

ओवेसी यांनी २ मिनिट १५ सेकंदाचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. "मी आपल्या भाषणादरम्यान हिंसाचारासाठी उकसवलं नाही किंवा धमकीही दिली नाही. मी आपल्या भाषणात पोलिसांच्या अत्याचारावर भाष्य केलं आहे. माझा व्हिडीओ काटछाट करुन दाखवण्यात आला आहे.," असंही ते म्हणाले. माझ्या बोलण्याचा उद्देश स्पष्ट आहे. जे शांतपणे तमाशा पाहतात, कारण गर्दीमध्ये एका रिक्षाचालकाला त्याच्या मुलीसमोर मारहाण केली जाते. मी त्या पोलिसांबद्दल बोललो जे मुलागा हाती असलेल्या व्यक्तीवर लाठ्यांचा वर्षाव करतात, असंही ओवेसींनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन