शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

MIM Owaisi on Inflation : महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढीला मोदी नाही, मुघल जबाबदार; ओवेसींचा टोमणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 14:43 IST

MIM Owaisi on Inflation : जरी डिझेल १०० रूपयांच्या वर आहे, तरी यासाठी पंतप्रधान मोदी नाही, औरंगजेब जबाबदार आहे असं म्हणत ओवेसींनी साधला निशाणा.

MIM Owaisi on Inflation : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी बेरोजगारी, महागाई अशा अनेक मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. महागाई, बेरोजगारीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाही, तर मुघल जबाबदार आहेत, असं म्हणत त्यांनी टोला लगावला.

यापूर्वीही अनेकदा अनेक मुद्द्यांवरून ओवेसी यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला होता. दरम्यान, एमआयएमनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ओवेंसींच्या भाषणाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते एका सभेला संबोधित करताना दिसत आहेत. “भारतातील तरूण बेरोजगार आहेत. महागाई गगनाला भिडत आह. डिझेल १०० रूपयांच्या पार गेलं आहे. पण नक्कीच यासाठी मोदी नाही, औरंगजेब जबाबदार आहे,” असं म्हणत ओवेसींनी निशाणा साधला.

“आज मुलांकडे नोकरी नाही, यासाठी अकबर जबाबदार आहे. पेट्रोल १०४ रूपये झालं आहे. त्यासाठी ताजमहाल तयार करणारा जबाबदार आहे. जर ताजमहाल बनला नसता तर आज पेट्रोल ४० रूपयांमध्ये मिळालं असतं. ताजमहाल, लालकिल्ला उभारून मुघलांनी चूक केली असं वाटतं. ते पैसे त्यांनी वाचवून ठेवायला हवे होते,” असंही ते पुढे म्हणाले.केवळ मुघलच दिसतात - ओवेसी"भारतात केवळ मुघलांचंच राज्य होतं का?, असा सवाल ओवेसी यांनी यावेळी केला. त्यांच्यापूर्वी सम्राट अशोक, चंद्रगुप्त यांचंही राज्य होतं. परंतु भाजपला एकीकडे मुघल आणि दुसरीकडे पाकिस्तान दिसतो. ना आम्हाला मुघलांशी काही घेणंदेणं आहे, ना पाकिस्तानशी काही संबंध. जिन्नांबद्दल आम्हाला काय करायचंय?, त्यांचा निर्णय आम्ही नाकारला होता," असंही ते म्हणाले.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीNarendra Modiनरेंद्र मोदीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनInflationमहागाई