शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

दूध आणखी महागणार, लवकरच 'एवढ्या' रुपयांची होणार वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 13:57 IST

आपला महिन्याचा बजेट लवकरच कोलमडण्याची शक्यता आहे.

नवी दिल्लीः आपला महिन्याचा बजेट लवकरच कोलमडण्याची शक्यता आहे. कारण पुन्हा एकदा दुधाची दरवाढ होणार असल्याचं एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. CRISILच्या रिपोर्टनुसार, स्किम्ड मिल्कच्या उत्पादनात आलेली घट आणि दिवसेंदिवस वाढत चाललेल्या मागणीमुळे दुधाचे दर पुन्हा एकदा भडकणार आहेत. दुधाचे हे वाढणारे दर येत्या तिमाहीमध्ये लागू होण्याची शक्यता आहे.दुधाचे दर वाढल्यानंतर इतर डेअर उत्पादनं जसे की, लोणी, तूप, दही आणि फ्लेवर्ड मिल्क महागणार आहेत. परंतु अमूल आणि मदर डेअरीनं अद्यापही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. दूध, आइसक्रीम यांसारख्या इतर दुधाच्या उत्पादनांची किंमत वाढणार असून, उत्पादनांच्या कमतरतेमुळे दुधाच्या दरात 1 ते 2 रुपयांची प्रतिलिटर वाढ होण्याची प्रस्तावित आहे. तसेच 2019-20मध्ये दुधाचे उत्पादन 3 ते 4 टक्क्यांनी घटण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. दुधाचा तुटवडा हा 6 ते 7 टक्क्यांनी वाढणार असून, त्यामुळेच दुधाची कमतरता जाणवणार आहे.  2017मध्येही दुधाच्या दरात प्रतिलिटर एक रुपयाची वाढ झाली होती. जगभरात स्किम्ड मिल्कचा दर 20 टक्क्यांनी वाढला आहे. मार्च 2018च्या शेवटी स्किम्ड मिल्कचा 3 लाख टन साठा होता. परंतु हा साठा आता 25 टक्क्यांनी घटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.मलाई येत नसलेल्या दुधाला स्किम्ड मिल्क म्हटलं जातं. तर गेल्या काही दिवसांपूर्वी सरकारनं अतिरिक्त दूध उत्पादनामुळे पडलेले दर, त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या रोषाच्या पार्श्वभूमीवर दूध अनुदान योजनेस तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती. मात्र, अनुदानाची रक्कम प्रतिलिटर पाच रूपयांवरून तीन रुपये करण्यात आली आहे. 

टॅग्स :milkदूध