शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
3
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
4
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
5
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
6
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
7
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
8
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
9
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
10
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
11
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
12
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
13
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
14
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
15
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
16
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
17
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
18
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
19
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
20
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला, पोलीस कर्मचारी शहीद तर एक CRPF जवान जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 16:20 IST

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी संघटनाकडून आगळीक सुरूच आहे. दहशतवाद्यांकडून खोऱ्यातील लष्कर आणि नागरिकांना सातत्यानं लक्ष्य करण्यात येत आहे.

पुलवामा

जम्मू-काश्मीरमधीलदहशतवादी संघटनाकडून आगळीक सुरूच आहे. दहशतवाद्यांकडून खोऱ्यातील लष्कर आणि नागरिकांना सातत्यानं लक्ष्य करण्यात येत आहे. पुलवामामधील पिंगलाना परिसरात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकाला लक्ष्य केलं आहे. या दहशतवादी हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी शहीद झाला तर एक CRPF जवान जखमी झाला आहे. जखमी जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुलवामाच्या पिंगलना येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त दलावर गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी शहीद झाला असून एक CRPF जवान जखमी झाला आहे. अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला आहे. परिसराची नाकेबंदी करण्यात येत आहे.

ओमर अब्दुल्ला यांनी केला घटनेचा निषेधजम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या दहशतवादी घटनेचा निषेध केला आहे. यासोबतच त्यांनी पोलीस कर्मचार्‍यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या. ओमर अब्दुल्ला म्हणाले की, "या हल्ल्याचा निषेध करत मी आज कर्तव्य बजावत असताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या जम्मू-काश्मीर पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो. जखमी सीआरपीएफ जवान लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करतो"

शोपियानमध्ये दहशतवादी मारला गेलायाआधी आज जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा एक दहशतवादी मारला गेला. शोपियांच्या नौपोरा भागातील नसीर अहमद भट असे या दहशतवाद्याचे नाव आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील बास्कुचन भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. याआधीही सुरक्षा दलाच्या डोळ्यात धूळ फेकून  हा दहशतवादी फरार झाला होता. सुरक्षा दल परिसरात शोध घेत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सैन्यानं प्रत्युत्तर दिलं आणि चकमक झाली, ज्यामध्ये लष्कर-ए-तैयबाचा एक स्थानिक दहशतवादी मारला गेला, असे अधिकाऱ्यानं सांगितलं.

टॅग्स :TerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू-काश्मीर