शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांची जमवाजमव, लष्कर सर्जिकल स्ट्राइकच्या तयारीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 17:33 IST

जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर गेल्या काही दिवसांपासून पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीत वाढ झाली असून, पाकिस्तानचे हे कारस्थान हाणून पाडण्यासाठी भारतीय लष्कर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करण्याची शक्यता आहे. 

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर गेल्या काही दिवसांपासून पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीत वाढ झाली असून, रविवारी सुंदरबनी परिसरात पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमने केलेल्या भ्याड हल्ल्यात भारताच्या तीन जवानांना वीरमरण आले होते. दरम्यान, नियंत्रण रेषेपलीकडे पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा लाँचिंग पॅड उभे केले असून, तेथे मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांची जमवाजमव होत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पाकिस्तानचे हे कारस्थान हाणून पाडण्यासाठी भारतीय लष्कर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करण्याची शक्यता आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी गोळा झाले असून, याठिकाणी पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयने 60 ते 70 दहशतवाद्यांची जमवाजमव केली आहे.  या दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कराकडून पुरेपूर मदत देण्यात येत आहे. हे सर्व दहशतवादी लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनांचे असल्याचे सांगण्यात येत आहे. दहशतवाद्यांची जमवाजमव झालेले लाँच पॅड हे भारताच्या तंगधार आणि उरी विभागांच्या थेट समोर आहेत. याच भागात मुजाहिद्दीन बटालियनची तैनाती करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. त्याद्वारे या भागातील भारतीय जवानांवर हल्ले वाढवण्याची घातक योजना पाकिस्तानने आखली आहे.  रविवारी पाकिस्तानच्या BAT च्या पथकाने भारतीय जवानांवर हल्ला केला होता. यात भारताच्या तीन जवानांना वीरमरण आले होते.  

टॅग्स :terroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक