शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमधील सुंजवा लष्करी तळावर दहशतवादी हल्ला; गोळीबार थांबला, ड्रोनने दहशतवाद्यांचा शोध सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2018 09:18 IST

ड्रोनद्वारे परिसराची पाहणी सुरू

श्रीनगर - काश्मीरमधील सुंजवा लष्करी तळावर शनिवारी पहाटे दहशतवाद्यांनी केला. हा लष्करी तळ जम्मू-पठाणकोट महामार्गालगत आहे. प्राथमिक माहितीनुसार, दहशतवाद्यांनी पहाटे साधारण 4.55 च्या सुमारास सुंजवा लष्करी तळाच्या परिसरात प्रवेश केला. काहीवेळातच येथील टेहळणी चौकीतील भारतीय जवानांना दहशतवादी दिसले. भारतीय जवानांनी लगेचच दहशतवाद्यांवर गोळीबार सुरू केला. त्यावेळी दहशतवाद्यांनीही भारतीय जवानांच्या दिशेने गोळीबार करून तेथून पळ काढला. दहशतवाद्यांच्या या गोळीबारात हवालदार पदावरील एक भारतीय जवान, त्याची मुलगी आणि इतर दोघे जखमी झाले आहेत. तर दहशतवाद्यांनी लष्करी तळावरच्या रहिवाशी वसाहतीमधील एका इमारतीमध्ये आसरा घेतल्याचे समजते. दहशतवाद्यांची नेमकी संख्या अजूनपर्यंत कळू शकलेली नाही. सध्या लष्करी तळाचा परिसर खाली करण्यात आला अाहे. आतमधून गोळीबाराचे आवाज ऐकायला येत आहेत. या पार्श्वभूमीवर नजीकच्या परिसरातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले असल्याची माहिती जम्मूचे पोलीस महानिरीक्षक एसडी सिंग जामवाल यांनी दिली. दरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश मिळालं आहे.  मात्र, काही वेळापूर्वी येथील गोळीबार थांबला असून सर्व दहशतवादी ठार झाल्याची शक्यता आहे. सध्या सैन्याकडून याची खातरजमा करण्यासाठी ड्रोनद्वारे संबंधित परिसराची पाहणी केली जात आहे. 

या घटनेनंतर भारतीय सैन्याकडून काश्मीरमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व लष्करी तळांवरील सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचा हात असल्याचे समजते.

गेल्या काही दिवसांमध्ये काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून मोठ्याप्रमाणावर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. तर दहशतवाद्यांकडून लष्करी तळांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी 5 फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी पुलवामाच्या काकापुरा येथील 50व्या राष्ट्रीय रायफल्सच्या छावणीवर हल्ला केला होता. यावेळी दहशतवाद्यांकडून गोळीबार आणि ग्रेनेडस् फेकण्यात आले होते. या हल्ल्यात भारतीय जवानांना कोणतीही इजा झाली नसली तरी दहशतवादी येथून पळून जाण्यात यशस्वी झाले होते.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्ला