शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तिरुपतीमधील शिवरायांच्या मूर्ती वादावर अखेर पडदा, नार्वेकरांची यशस्वी मध्यस्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 14:47 IST

गेल्या 15 दिवसांपासून समाज माध्यमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती न लावण्या बाबतचे तिरुपती देवस्थानच्या टोलनाक्यावरील व्हिडिओ फिरत असल्याने महाराष्ट्रात सर्वच पक्षांत संतप्त प्रतिक्रिया उमटत होती.

मुंबई - महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती असलेली असलेली वाहने तिरूपती देवस्थानाच्या टोलनाक्यांवर अडवण्यात येत असल्याचे व्हिडियो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने महाराष्ट्रात प्रचंड क्षोभ निर्माण झाला होता. शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर हे तिरुपती देवस्थानाच्या बोर्डवर सदस्य असल्याने महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते 'धनंजय जुन्नरकर यांनी ट्विटच्या माध्यमातून त्यांना विनंती केली होती. त्याची त्वरीत दखल घेऊन नार्वेकर यांनी सदर समस्या सोडवलेली आहे.

गेल्या 15 दिवसांपासून समाज माध्यमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती न लावण्या बाबतचे तिरुपती देवस्थानच्या टोलनाक्यावरील व्हिडिओ फिरत असल्याने महाराष्ट्रात सर्वच पक्षांत संतप्त प्रतिक्रिया उमटत होती. कोणत्याही देवांच्या, राजकीय मूर्त्या, झेंडे, स्टीकर लावल्यास गाड्या सोडणार नाही, असे व्हिडीओत प्रसिद्ध झाले होते. सदर प्रकरण चिघळल्यास मोठी अशांतता माजू शकते हा गंभीर धोका ओळखून धनंजय जुन्नरकर यांनी  मिलींद नार्वेकर यांना समस्या सोडवण्यासाठी विनंती केली होती.

मिलींद नार्वेकर यांच्या मातोश्रीचे नुकतेच निधन झालेले होते आणि त्यांचा दुखवटा देखील संपला नसतानाही त्यांनी तेथील व्यवस्थापकीय प्रमुख धर्मा रेड्डी यांना पत्र लिहीले, व त्यांची भेट घेतली. त्याबद्दल खुलासा करणारा व्हिडिओ देखील प्रसारीत केला. तसेच धर्मा रेड्डी यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीदेखील भेट दिली. सदर मुर्ती रेड्डी यांनी आदरपूर्वक स्वीकारली. मूर्ती बाबत कोणताही वाद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असल्याने, जुन्नरकर यांनी आता सदर वादावर आता पडदा पडल्याचे लोकमतला सांगितले. 

 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMilind Narvekarमिलिंद नार्वेकरtirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाट