शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणानंतर थंडी, तापाची सौम्य लक्षणे, सर्वजण डॉक्टरांच्या निगराणीखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 06:56 IST

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर शनिवारी ७४ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा डोस देण्यात आला होता. यातील एकालाही रिॲक्शन झाली नाही,  अशी माहिती नोडल ऑफिसर डॉ.जगन्नाथ दीक्षित यांनी दिली. येथील कर्मचाऱ्यांना भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ लस  देण्यात आली, असेही त्यांनी सांगितले.

मुंबई : देशभरात शनिवारी उत्साहात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर रविवारी राज्यात लस घेतलेल्या काहींना थंडी, ताप व उलट्यांचा त्रास झाला. जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, अकोला, बीड, कराड येथेही काहींना थंडी, ताप आला. या सर्वांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. थंडी, तापाची सौम्य लक्षणे असून  कोणालाही गंभीर दुष्परिणाम नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  जळगाव, औरंगाबादला कोविशिल्ड लस घेतलेल्या १६ जणांना थंडी, तापाची सौम्य लक्षणे आढळली. चौघांना एक-दोन दिवसांंत रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी सांगितले. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर शनिवारी ७४ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा डोस देण्यात आला होता. यातील एकालाही रिॲक्शन झाली नाही,  अशी माहिती नोडल ऑफिसर डॉ.जगन्नाथ दीक्षित यांनी दिली. येथील कर्मचाऱ्यांना भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ लस  देण्यात आली, असेही त्यांनी सांगितले.कऱ्हाड (जि. सातारा) येथे पाच आरोग्य सेवकांना अचानक त्रास जाणवू लागला. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती स्थिर झाल्याने सर्वांना सायंकाळी घरी सोडण्यात आले. बीड जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून काहींना ताप, अंगदुखी, डोकेदुखी अशी लक्षणे जाणवत असल्याचे समोर आले. जवळपास १४ जणांना उपचार करून तात्काळ सुटी देण्यात आली. अकोल्यात रविवारी सकाळी लस घेतलेल्या दोन महिला कर्मचाऱ्यांना थंडी, ताप आला. दोघींवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रिॲक्शन हे सकारात्मक -कोणत्याही लसीकरणानंतर रिॲक्शन येत असते. साैम्य स्वरुपात ताप येणे ही एकप्रकारे सकारात्मक रिॲक्शन असते. लसीकरणानंतर शरीरात प्रतिसाद सुरू झाला, हे त्यातून दिसून येते. गंभीर रिॲक्शन ही लसीकरणानंतर अर्ध्या तासातच येत असते. - डॉ. विजय वाघ, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा लसीकरण अधिकारी, औरंगाबाद 

देशात ४४७ जणांवर लसीचे दुष्परिणाम -आतापर्यंत देशभरातून एकूण ४४७ जणांवर लसीचे दुष्परिणम दिसून आल्याची माहिती केंद्रीय आराेग्य मंत्रालयाने दिली आहे. यापैकी ३ जणांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये एक नर्स आजारी पडली. तर, दिल्लीमध्येही एका जणाची प्रकृती बिघडली. केवळ दिल्लीमध्ये ५१ जणांवर परिणाम दिसून आले. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याmedicineऔषधंdocterडॉक्टरhospitalहॉस्पिटल